Nagpur Winter Session: देवेंद्र फडणवीस ‘रामगिरीत’ तर अजित पवार यांना ‘विजयगड’ एकनाथ शिंदेचा बंगला कोणता?

158

महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून नंबर दोन नंबरच्या बंगल्यात राहतील. या पार्श्वभूमीवर त्यांना नागपूरचा देवगिरी बंगला (Devagiri Bungalow) देण्यात येत आहे. तर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूर्वीप्रमाणेच विजयगड बंगला (Vijayagad Bungalow) देण्यात आला आहे. देवगिरी बंगला मंत्रिमंडळातील २ नंबरच्या व्यक्तीला देण्यात येतो. आतापर्यंत या बंगल्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राहत होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळात दोन नंबरवर कोण असणार याची चर्चा होती. (Nagpur Winter Session)

एकनाथ शिंदे यांना मिळणार देवगिरी बंगला 

एकनाथ शिंदे यांना देवगिरी बंगला (Devagiri Bungalow) देण्यात आला आहे. हा बंगला कॅबिनेटमधील दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्याला देण्यात आला आहे. महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील निवासस्थानाचे नाव रामगिरी (Ramgiri Bungalow) आहे, जिथे तयारी पूर्ण झाली आहे. पूर्वी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना रामगिरी हा बंगला देण्यात आला होता. आता मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस रामगिरीत राहणार आहेत. १६ तारखेपासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी विधानसभेच्या सचिवालयाने शनिवारपासून नागपूरच्या विधानसभेत कामाला सुरुवात केली आहे. 

१४ डिसेंबरला मंत्रिमंडळाची शपथ 

महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा शपथविधी (Cabinet Oath Ceremony) १४ डिसेंबरला होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. नागपुरात या मंत्र्यांसाठी कॉटेज सुसज्ज करण्यात येत आहेत. कॅबिनेट मंत्री असो वा राज्यमंत्री असो. विरोधी पक्षनेते कोण होणार हे अद्याप ठरलेले नाही. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याचे निवासस्थानही निश्चित करण्यात आले आहे. तसेच कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेत्यांच्या नावाचे फलक लावायचे आहेत. मंत्र्यांच्या नावाची घोषणा होताच त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या नावाचे फलक लावण्यात येणार आहेत. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.