Naib Singh Saini : नायब सिंग सैनी बनले हरियाणाचे मुख्यमंत्री; 5 मंत्र्यांचाही झाला शपथविधी

Naib Singh Saini : मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्याशिवाय एकूण 5 मंत्र्यांनीही शपथ घेतली. शपथ घेण्यापूर्वी नायबसिंग सैनी यांनी मनोहर लाल (Manohar Lal Khattar) यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले.

212
Naib Singh Saini : नायब सिंग सैनी बनले हरियाणाचे मुख्यमंत्री; 5 मंत्र्यांचाही झाला शपथविधी
Naib Singh Saini : नायब सिंग सैनी बनले हरियाणाचे मुख्यमंत्री; 5 मंत्र्यांचाही झाला शपथविधी

लोकसभा निवडणुकीपूर्वी (loksabha election 2024) हरियाणातील जनतेला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. राजभवनात मंगळवार, 12 मार्च रोजी संध्याकाळी झालेल्या शपथविधी सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष नायबसिंग सैनी यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी नायब सिंग सैनी यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. (Naib Singh Saini)

(हेही वाचा – Eastern and Western Expressway Bridges : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतुकीसाठी बांधणार तीन भुयार आणि उड्डाणपूल)

5 मंत्र्यांनीही घेतली शपथ

यावेळी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्याशिवाय एकूण 5 मंत्र्यांनीही शपथ घेतली. शपथ घेण्यापूर्वी नायबसिंग सैनी यांनी मनोहर लाल (Manohar Lal Khattar) यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. नायब सैनी हे ओबीसी प्रवर्गातील असून ते कुरुक्षेत्र मतदारसंघाचे खासदार आहेत. तत्पूर्वी जेजेपी सत्तेतून बाहेर पडल्याने सरकार अल्पमतात आल्यामुळे मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात कंवर पाल गुर्जर यांनीही मंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. कंवर पाल गुर्जर हे खट्टर सरकारमध्ये शिक्षणमंत्री होते. मूलचंद शर्मा यांनाही कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत अपक्ष आमदार रणजित सिंह हेही कॅबिनेट मंत्री झाले आहेत. जयप्रकाश दलाल आणि डॉ. बनवारी लाल यांनीही हरियाणा सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. परंतु, या शपथविधी सोहळ्यादरम्यान अनिल विज बेपत्ता होते. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत नायब सैनी यांच्या नावाची घोषणा होताच अनिल विज संतापले आणि त्यांनी तातडीने बैठक सोडून निघून गेले होते. (Naib Singh Saini)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.