Nallasopara Assembly Elections मध्ये चौरंगी लढतीची शक्यता; नक्की कोण बाजी मारणार?

129
Nallasopara Assembly Elections मध्ये चौरंगी लढतीची शक्यता; नक्की कोण बाजी मारणार?
Nallasopara Assembly Elections मध्ये चौरंगी लढतीची शक्यता; नक्की कोण बाजी मारणार?
  • सुप्रिम मस्कर

    नालासोपारा विधानसभा मतदारसंघ हा पालघर लोकसभा मतदारसंघातील सर्वात हायव्हॉलटेज नाट्यमय राजकीय घडामोंडींचा केंद्र असणारा विधानसभा मतदारसंघ ठरत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर पालघर जिल्ह्यात वर्चस्व असणाऱ्या बहुजन विकास आघाडी पक्षात उभी फूट पडणार असल्याची चर्चा होती. गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भातील बातम्याही माध्यमातून प्रसिद्ध होत होत्या. त्याच पार्श्वभूमीवर आपण आज नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील मुख्य लढती आणि उमेदवारांसमोर आव्हान याबद्दल जाणून घेऊया. (Nallasopara Assembly Elections)

नालासोपारा विधानसभा मतदारसंघात यावेळी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात बविआकडून क्षितीज ठाकूर(Kshitij Thakur), भाजपकडून राजन नाईक (Rajan Naik), शिवसेना (उबाठा) कडून पकंज देशमुख (Pankaj Deshmukh) आणि स्वराज्य अभियानतर्फे धनंजय गावडे (Dhananjay Gawade) विधानसभेच्या रिंगणात उतरतील, अशी शक्यता आहे. त्यात भाजपकडून राजन नाईक (Rajan Naik)यांची उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर झाली आहे. बविआचे उमेदवार क्षितीज ठाकूर(Kshitij Thakur) असतील कारण ते बविआचे विद्यमान आमदार देखील आहेत. विशेष म्हणजे, नालासोपारा विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीनंतर सलग तीन वेळा ते या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र याच मतदारसंघात २०१९ ला बविआला शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी ठाकूरांना चांगलीच लढत दिली होती. (Nallasopara Assembly Elections)

२००९ ते २०१९ नालासोपारा विधानसभा मतदारसंघात काय घडले?

२००९ ला नालासोपारा विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. वसई विधानसभेची त्यावेळी वसई, नालासोपारा आणि बोईसर अशा तीन मतदारसंघात विभागणी करण्यात आली होती. त्यावेळी अवघ्या वयाच्या २६ व्या वर्षी क्षितीज ठाकूर राजकारणाच्या रिंगणात उतरले. त्यावेळी वडील तथा बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या मतदारसंघातील लोकप्रियेचा आणि राजकीय क्षेत्रातील अनुभवाचा फायदा क्षितीज ठाकूर (Kshitij Thakur)यांना झाला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत बविआचे क्षितीज ठाकूर विरुद्ध शिवसेनेचे शिरीष चव्हाण अशी लढत झाली. तेव्हा ४० हजार मतांच्या फरकाने क्षितीज ठाकूर यांनी शिवसेनेच्या शिरीष चव्हाण यांना पराभूत केले. त्यावेळी मनसेचे उमेदवार विवेक केळुस्कर यांच्यामुळे शिवसेनेची २० हजार मते मनसेकडे वळली होती. ज्यामुळे शिरीष चव्हाण यांना निवडणुकीत पराभवाला सामारे जावे लागले. (Nallasopara Assembly Elections)

२०१४ ला नालासोपारा विधानसभा निवडणुकीत बविआ, भाजपा, शिवसेना अशी त्रिपक्षीय मुख्य लढत झाली. यावेळी बविआकडून पुन्हा क्षितीज ठाकूर(Kshitij Thakur), भाजपकडून राजन नाईक आणि शिवसेनेकडून शिरीष चव्हाण रिंगणात होते. त्यावेळी क्षितीज ठाकूर यांनी ५४ हजार मतांच्या फरकाने राजन नाईक(Rajan Naik) यांचा पराभव केला. मात्र २००९ ला एकूण मतांच्या ५२. ८४ टक्के मते मिळवलेले क्षितीज ठाकूर २०१४ ला फक्त ५०.२९ टक्के मते मिळवू शकले. यावेळी शिवसेनेचे उमेदवार शिरीष चव्हाण तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांनी ४० हजारांहून अधिक मते या निवडणुकीत मिळवली होती. (Nallasopara Assembly Elections)

त्यानंतर २०१९ ला नालासोपारा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाने युतीचा उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या रुपाने नालासोपाराकरांना दिला. २०१९ ची निवडणूक मात्र बविआच्या क्षितीज ठाकूर यांच्यासाठी कठीण ठरली कारण यावेळी एन्काऊंटर स्पेशलिस्ट असलेल्या प्रदीप शर्मांना उमेदवार मिळाल्याने लोकांनी त्यांना चांगलीच पसंती दिली. त्यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावून तसेच स्टार प्रचारकांना नालासोपाऱ्यात आणून निवडणूक प्रचार घडवून आणला होता. त्यामुळे क्षितीज ठाकूर(Kshitij Thakur) यांना १ लाख ४९ हजार ६८ मते मिळाली होती. तर प्रदीप शर्मा यांना १ लाख ६ हजार ३९ मते मिळाली होती. ज्यामुळे प्रदीप शर्मा फक्त ४३ हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले. या सगळ्याचा परिणाम असा झाला की, भाजप समर्थकांमध्ये या मतदारसंघाबाबत सकारात्मकता निर्माण झाली. त्यामुळे या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं होतं. (Nallasopara Assembly Elections)

आता वास्तव परिस्थिती काय?

आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत बविआचे क्षितीज ठाकूर आणि भाजपाचे राजन नाईक (Rajan Naik)यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. मात्र याआधी बविआतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते समजले जाणारे राजीव पाटील यांच्या बंडाची बरीच चर्चा मतदारसंघात झाली. राजीव पाटील आपल्या समर्थक नगरसेवकांसह भाजपात प्रवेश करणार असून नालासोपारा विधानसभा मतदारसंघात पुतण्या क्षितीज ठाकूर विरोधात उभे राहणार होते. त्यामुळे बविआतील फुटीने सोपाऱ्यातील राजकीय वातावरण बदलेले असते. परंतु आईने भावनिक साद घातल्याने आणि भाऊ हितेंद्र ठाकूर यांच्यामुळे राजीव पाटील यांनी निवडणूक लढवणार नसल्याची अधिकृत घोषणा दि. १९ ऑक्टोबर रोजी केली. या सगळ्यात बविआ समर्थकांमध्ये चलबिचल निर्माण झाली होती. कारण २०२० पासून या महापालिका क्षेत्रात महापालिकेची निवडणूक झालेली नाही. त्यामुळे बविआचे नगरसेवक कोण? याचीच अनेकांना माहिती नाही. अशावेळी विधानसभा निवडणूक लागल्याने क्षितीज ठाकूर राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना हजेरी लावून भावनिक साद घालत आहेत.

मात्र बंडाच्या संकेतानंतर क्षितीज ठाकूर यांची सीट धोक्यात आली होती. कारण राजीव पाटील बविआतील मोठे नेते होते. परंतु आता त्यांनी माघार घेतल्याने क्षितीज ठाकूर यांचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जातयं. बंडाचे पडसाद कायम आहेत, त्याचा फटका क्षितिज ठाकूर यांना बसू शकतो. दुसरीकडे भाजपकडून राजन नाईक, शिवसेनेचे माजी नगरसेवक असलेले धनंजय गावडे (Dhananjay Gawade) स्वराज्य अभियान पक्षामार्फत त्यांना टक्कर द्यायला उभे ठाकले आहेत. त्यात भाजपही स्थानिक पातळीवर सक्रीय झाली आहे. गावडेंनीही तीन महिन्यांपासून सोपाऱ्यात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यात उबाठा गटाच्या अनेक शाखा प्रमुखांना आपल्याकडे वळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. यामुळे नालासोपाऱ्यात उबाठा गटाकडून कुणीच इच्छुक राहिलेले नाही. जिल्हाप्रमुख असणारे पंकज देशमुख हे वसई विधानसभेतून लढण्यास इच्छुक आहेत. मात्र त्यांची बोळवण नालासोपारा मतदारसंघातील उमेदवारीने केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्षितीज ठाकूर (Kshitij Thakur)यांच्यासमोर असणाऱ्या चौरंगी लढतीचा सामना ते कशा पद्धतीने करतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. अशा रीतीने ठाकूर यांना तगड आव्हान इतर उमेदवारांकडून दिलं जाऊ शकतं हे निश्चित.(Nallasopara Assembly Elections)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.