Saras Baug मध्ये नमाज पठण; जागेवर कब्जा करण्याचे कट कारस्थान?

स्थानिक हिंदूंनी शुक्रवारी पोलीस ठाण्यात जावून दबाव आणला. ज्यामुळे अखेर पोलिसांनी नमाज पठण करणाऱ्या अज्ञात 5 मुसलमानांच्या विरोधात भादवी 295(अ), 188, 143 , महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1) (ई) सह 135 नुसार गुन्हा दाखल केला.

233

पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग (Saras Baug) सध्या चर्चेत आहे. पुण्यातील पर्यटन स्थळांपैकी एक सारसबाग आहे. इथे पुणेकरांची तसेच पर्यटकांची कायम वर्दळ असते. मात्र या सार्वजनिक ठिकाणी मुसलमान नमाज पठण करू लागले आहेत. त्यामुळे आता हा विषय अधिक संवेदनशील बनला आहे. याला आता जागृत हिंदूंकडून विरोध होऊ लागला आहे. मागील दोन शुक्रवारी हिंदूंनी या बागेतील तळ्यातील गणपती मंदिरात सामूहिक शिववंदना म्हणण्यास सुरुवात केली. ज्यामुळे प्रकरण अजून तापले आहे. अखेरीस पोलिसांची नमाज पठण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण या बागेत नमाज पठण सुरु केल्यामुळे या जागेचा कब्जा करण्याचे कट कारस्थान आहे का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

 आधी हिंदूंच्या विरोधात नंतर मुसलमानांच्या विरोधात गुन्हा दाखल 

शुक्रवार, ५ जुलै रोजी हिंदूंनी जेव्हा येथे शिववंदना आयोजित केली, त्यावेळी आयोजकांच्या विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच जेव्हा पोलिसांना हिंदू पुढील शुक्रवारी, 12 जुलै रोजीही शिववंदना म्हणणार आहेत, हे समजल्यावर आयोजकांच्या विरोधात पोलिसांनी नोटिस बजावली. पोलिसांच्या या कारवाईमुळे स्थानिक हिंदू संतापले आणि त्यांनी शुक्रवारी पोलीस ठाण्यात जावून दबाव आणला. ज्यामुळे अखेर पोलिसांनी नमाज पठण करणाऱ्या अज्ञात 5 मुसलमानांच्या विरोधात भादवी 295(अ), 188, 143 , महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1) (ई) सह 135 नुसार गुन्हा दाखल केला.

(हेही वाचा ISIS : छत्रपती संभाजीनगरात आयसीसचं जाळं? ५० हून अधिक तरुण संपर्कात)

काय आहे सारसबागेचा इतिहास? 

मात्र या सर्व प्रकारामुळे आता पुण्यातील सारसबागेत (Saras Baug) असाच प्रकार सुरू राहिला, तर उद्या मोडस ऑपरेंडीनुसार तिथे मजार बांधली जाईल, त्यानंतर मशीद उभारली जाईल आणि शेवटी ही जागा वक्फची असल्याचा दावा करून ती हडपली जाईल, अशी भीती स्थानिक हिंदूंना वाटू लागली आहे. त्यामुळे आता सरसबागेचा इतिहास, या जागेचे ऐतिहासिक पुरावे काय हे आता पुन्हा समजून घेण्यात येऊ लागले आहेत. या बागेत (Saras Baug) श्री गणेश मंदिर आहे. ज्याला तळ्यातला गणपती म्हणून ओळखले जाते. पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या या बागेतील हे गणपती मंदिर पेशव्यांचे पूजास्थान होते. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पर्वतीच्या पायथ्याशी सन १७५० साली आंबील ओढ्याच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम सुरू झाले. तलावाचे काम सन १७५० ते १७५३ या कालावधीपर्यंत चालले होते. त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे २५ एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता. तलावात सारस पक्षी सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५००० चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग-बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले. त्यानंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेला काव्यात्मक ‘सारस बाग’ (Saras Baug) असे नाव ठेवले. श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. साहजिकच पर्वती, सारस बाग आणि तलाव ही पुणेकरांची फिरावयास येण्याची व देवदर्शनाची ठिकाणे झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात सन १८६१ च्या सुमारास शहरातील अनेक जागा पुणे नगरपालिकेकडे देण्यात आल्या. त्यावेळी गणपती मंदिराचे बेट सोडून तलावाची जागा मुंबई सरकारने पुणे नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. पुणे नगरपालिकेकडून साधारण सन १९६६ साली तलावाचे जागेत उद्यान विकसित करण्यात आले. अशा या ऐतिहासिक जागेवर मुसलमानांनी वाकडी नजर पडली आहे, त्यामुळे हिंदूंनीही वेळीच सतर्क होऊन याला संघटित यशस्वी विरोध केला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.