मागील अनेक दिवसांपासून भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर कुणाची निवड होणार यावर जोरदार चर्चा सुरु आहे. कालपर्यंत महाराष्ट्रातून विनोद तावडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र आता भाजपाने नेहमीप्रमाणे धक्कादायक निर्णय घेण्याची परंपरा याही विषयात कायम ठेवण्याचा विचार केला असावा, असे दिसते. कारण चर्चेत असलेली सर्व नावे बाजूला ठेवून पक्षाच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची निवड करण्याचा निर्णय पक्ष श्रेष्ठींनी घेतला असल्याचे समजते.
भेटीगाठीतून निर्णय
भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने त्यांच्या जागी नव्या अध्यक्षाची नेमणूक होणार आहे. या पदासाठी विनोद तावडे यांच्यासह अनेक नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र आता केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केली आहे, अशी चर्चा रंगली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सहा परिवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्याचा बरोबर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर गृहमंत्री अमित शाह यांचीही त्यांनी भेट घेतली होती.
(हेही वाचा मालवणीत Hindu युवतीला राहते घर सोडून जाण्यासाठी मुसलमानांकडून छळ)
या सर्व भेटींमध्ये झालेल्या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना आता राज्यातून देशपातळीवर काम करण्याची संधी देण्याचे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने निश्चित केल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला फटका बसला. याची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राज्य सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे आणि संघटनेची जबाबदारी द्यावी, अशी मागणी जाहीररीत्या भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केली होती. मात्र याबाबत नंतर विचार करू, असे केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांना सांगण्यात आले होते. अखेर आता फडणवीस यांच्यावर भाजपाची महाराष्ट्रापुरती नव्हे तर थेट देशपातळीवरील जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
Join Our WhatsApp Community