भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुंबई-पुणे मार्गावरील बोर घाट मिसिंग लिंकला ‘हुतात्मा वीर शिंग्रोबा धनगर बोगदा’ असे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून वीर शिंग्रोबा यांच्या शौर्यकथेचा उचित सन्मान करण्याची विनंती केली आहे.
(हेही वाचा- Ayodhya : ‘पुढील काही दिवस अयोध्येत येणे टाळा…’, राम मंदिर ट्रस्टने भाविकांना का केले न येण्यासाठी अपील ?)
पडळकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, खंडाळा घाटातील हा मार्ग ब्रिटिशांना दाखवण्याचे ऐतिहासिक कार्य वीर शिंग्रोबा धनगर यांनी केले होते. मात्र, स्वातंत्र्याची मागणी केल्यामुळे ब्रिटिशांनी त्यांची निर्घृण हत्या केली होती. त्यांच्या बलिदानाची दखल घेऊन बोर घाट मिसिंग लिंकला त्यांचे नाव देण्याची गरज असल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे.
वीर शिंग्रोबा यांचे शौर्य आणि त्यांचा इतिहास नव्या पिढीला समजावा आणि त्यांच्या कार्याला उचित सन्मान मिळावा, यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे पडळकर यांनी पत्रात नमूद केले आहे. राज्य सरकार या मागणीला कोणता प्रतिसाद देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community