Tanaji Sawant यांच्यामुळे महायुतीत बेबनाव?

103
Tanaji Sawant यांच्यामुळे महायुतीत बेबनाव?
Tanaji Sawant यांच्यामुळे महायुतीत बेबनाव?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळातील आरोग्य मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यामुळे महायुतीत बेबनाव वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अजित पवार यांची नाराजी

धाराशीवमधील एका कार्यक्रमात सावंत यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अजित पवार यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी तर हा अपमान अजित पवार (Ajit Pawar) यांचा असून महायुतीतून बाहेर पडलेले चालेल, असा सूर लावला. तसेच सावंत यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, अशी जोरदार मागणीही केली आहे.

(हेही वाचा – PM Modi Wadhvan Port Bhoomipujan: शिवरायांच्या चरणी डोकं ठेवून माफी मागतो…)

उलट्या होतात

“मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. शिक्षण घेत असल्यापासून आत्तापर्यंत कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझं जमलेलं नाही, हे वास्तव आहे. आज जरी कॅबिनेटमध्ये आम्ही मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ते सहन होत नाही,” असे वक्तव्य सावंत यांनी जाहीरपणे केले.

सत्तेतून बाहेर पडावे

त्यावर धर्मराव बाबा आत्राम (राष्ट्रवादी अजित पवार गट) यांनी सावंतांना टोला हाणला, “सावंत कॅबिनेट बैठकीला माझ्याच बाजूला बसतात पण कधी त्यांना उलटी करताना मी पहिले नाही.” तर प्रवक्ते उमेश पाटील यांनी सावंतांच्या वादग्रस्त विधानाला प्रत्युत्तर दिले. “अजित दादांना तुम्ही सत्तेत घेतलं नाही, उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाजपाच्या मदतीनेच मुख्यमंत्री झाले. त्यामुळे आरोग्य मंत्र्याचे असे विधान ऐकून घेण्याऐवजी अजित दादांनी सत्तेतून बाहेर पडावे,” असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.