राज्यात २९ लाख १२ हजार मतदारांची नावे वगळली

158

एकीकडे राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असताना, राज्यातील २९ लाख १२ हजार ८२२ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. दुबार मतदार, मृत मतदार, छायाचित्रे नसलेल्या मतदारांचा यात प्रामुख्याने समावेश आहे.

( हेही वाचा : कुलाब्यातील या झोपडपट्ट्यांमधील पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याची समस्या होणार दूर )

युवा आणि महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने ८ डिसेंबरपर्यंत नव्याने मतदार नोंदणी सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच मतदारांची आकडेवारी जाहीर केली. त्यातून राज्यभरातील २९ लाख १२ हजार ८२२ मतदार वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील २९ लाख १२ हजार ८२२ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. राज्यात नव्याने १३ लाख ९३ हजार ७५५ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण मतदारांची संख्या ८ कोटी ९८ लाख ४२ हजार ३०१ झालेली आहे. तर ८५.३ तृतीय पंथी मतदारांची नोंद झालेली आहे.

‘या’ जिल्ह्यातून सर्वाधिक नावे वगळली

निवडणूक आयोगाने मतदार यादीतून वगळलेल्या एकूण नावांपैकी सर्वाधिक ५ लाख १० हजार ८७१ मतदार ठाणे जिल्ह्यातील आहेत. राज्यात सर्वाधिक ८५३ तृतीय पंथीयांची मतदार नोंदणी ठाणे जिल्ह्यात झाली आहे. ठाणे जिल्ह्यात ३३ लाख २८ हजार ९ पुरुष मतदार असून २८ लाख ६ हजार ९३ महिला मतदार आहेत. मृत, दुबार नावे, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.