विधिमंडळ अधिवेशनाच्या थेट प्रक्षेपणात आता मंत्री, आमदारांचे नाव झळकणार

218
मंत्र्यांच्या PA ना खुणावत आहे विधिमंडळ इमारत

महाराष्ट्र विधिमंडळाच्या थेट प्रक्षेपणामुळे सभागृहात सरकारने केलेल्या घोषणा, निर्णय एका क्षणात नागरिकांपर्यंत पोहोचू लागले आहेत. मात्र, सभागृहातील कामकाजात सहभागी होताना कोण आमदार बोलत आहेत आणि त्यांच्या प्रश्नांना नेमके कोणते मंत्री उत्तर देत आहेत, याची अनेकांना ओळख पटत नाही. हा संभ्रम दूर करण्यासाठी अधिवेशनादरम्यान सभागृहात बोलताना आमदार तसेच मंत्र्यांची नावे थेट प्रक्षेपणादरम्यान दिली जाणार आहेत. येत्या पावसाळी अधिवेशनापासून या नव्या प्रयोगाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

(हेही वाचा – Congress : जागा वाटपाबाबत काँग्रेसचा नवा फॉर्म्युला; मेरिटनुसार जागावाटप )

अधिवेशनादरम्यान आमदार आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सभागृहासमोर मांडत असतात. आपल्या मतदारसंघातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी, त्यासाठी लागणारा निधी मिळवण्यासाठी तारांकित प्रश्नाद्वारे लक्षवेधी सूचना अशा विविध आयुधांमार्फत सरकारचे लक्ष वेधत असतात. मात्र, थेट प्रक्षेपणादरम्यान कोण आमदार बोलत आहेत, त्याची ओळख बऱ्याच जणांना पटत नाही.

ही अडचण दूर करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेच्या धर्तीवर महाराष्ट्र विधिमंडळाच्या प्रक्षेपणावेळी भाषण करणाऱ्या सदस्याचे नाव खालच्या पट्टीत दिले जाणार आहे. त्यासाठी विधिमंडळ सचिवालय आवश्यक नव्या प्रणालीबरोबरच इतर सुविधांची माहिती गोळा करून त्यासाठी येणारा खर्च पिठासीन अधिकाऱ्यांकडे प्रस्तावित करणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.