-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
शिवडी विधानसभेत भाजपाकडून ज्या उमेदवाराने बंडखोरी केली होती, त्या उमेदवाराचे पक्षात सहा वर्षांकरता निलंबन करण्यात आल्यानंतर आता त्याच भाजपाच्या पदाधिकाऱ्याला शिवसेनेत प्रवेश देत शिवडी विधानसभेची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे भाजपाने निलंबित केलेल्या पदाधिकाऱ्याला शिवसेनेत प्रवेश दिला गेल्याने, एकप्रकारे मागील विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेने पाठिंबा दिलेल्या मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांचा पराभव केल्याबद्दल शिवसेनेने संजय नाना आंबोले यांना बक्षिसी दिली का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
(हेही वाचा – Salman Khan ला धमकी देणारा निघाला मनोरुग्ण; वडोदरा येथून घेण्यात आले ताब्यात)
शिवडी विधानसभा निवडणुकीत मनसेचे बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांना भाजपा आणि शिवसेनेने पाठिंबा दिल्यानंतरही भाजपाचे माजी नगरसेवक नाना आंबोले यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरुन बंडखोरी केली. त्यानंतर आंबोले यांनी भाजपाचा आपल्याला पाठिंबा असल्याचा प्रचार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर भाजपाने आपला पाठिंबा या मतदारसंघापुरता मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना असून नाना आंबोले हे आमचे उमेदवार नाहीत, असा खुलासा केला होता. तसेच त्यानंतर त्यांचे सहा वर्षांकरता पक्षातून निलंबन केले होते. या निवडणुकीत मनसेचे बाळा नांदगावकर हे पराभूत झाले आणि शिवसेनेचे अजय चौधरी हे विजयी झाले होते. अपक्ष नाना आंबोले यांच्या पराभव झाल्यानंतर, मागील काही महिन्यांपासून नाना आंबोले यांच्या शिवसेना पक्षातील प्रवेशाची चर्चा होती.
(हेही वाचा – Cabinet Decision 2025 : मंत्रीमंडळात ७ महत्त्वपूर्ण निर्णय; आता, नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार)
दोन दिवसांपूर्वी नाना आंबोले यांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर नाना आंबोले यांच्यावर शिवडी विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना आणि भाजपाची महायुती असून भाजपाने निलंबित केलेल्या नाना आंबोले यांना शिवसेनेत प्रवेश दिल्यामुळे शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी भाजपाला शह द्यायला निघाली का असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे नाना आंबोले यांना पक्षात प्रवेश देताना दक्षिण मुंबईतील पदाधिकाऱ्यांनाही विचारात घेण्यात आले नाही तसेच त्यावेळी दक्षिण मुंबईतील विभागप्रमुख तसेच पक्षाचे नेतेही उपस्थित नव्हते. (Bala Nandgaonkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community