काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मोदी यांना मारू शकतो’ असे विधान केल्यामुळे भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी नाना पटोले यांच्या विरोधात भंडारा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. तर, ‘नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते’ असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांनी फटकारले आहे.
काय म्हणाले नाना,… pic.twitter.com/kv27Ql5b7k
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) January 17, 2022
भाजप न्यायालयात जाणार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध विधान केले असताना आज त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहे. पण नाना पटोले यांनी आपण गावातील मोदी नावाच्या गावगुंडाबद्दल वक्तव्य केल्याचा खुलासा केला. पण भाजप आता आक्रमक भूमिका घेतली आहे.भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी नाना पटोले यांच्या विरोधात भंडारा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तक्रार घेतली असून चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र उद्या सकाळपर्यंत नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायालयात धाव घेऊ, असा इशाराही मेंढे यांनी दिला.
फडणवीसांनी फटकारले
तर, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Join Our WhatsApp Communityकाँग्रेस पक्षाचे @INCIndia चालले तरी काय❓
कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही❓
काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन?
नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते❗️— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 17, 2022