मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे परदेशात गेले आहेत, ते भारतात नाहीत, असा खुलासा केंद्रीय तपास यंत्रणांनी केला आहे. त्यावेळी सिंग यांचे शेवटचे लोकेशन हे गुजरात- अहमदाबाद हे होते. त्यावरून परमबीर सिंग यांना देशाबाहेर जाण्यासाठी केंद्राचाच हात आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
…तर परमबीर सिंग यांना अटक केली असती!
ज्या ज्या राज्यात भाजपचे सरकार नसेल तिथे तिथे आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांना हाताशी धरून सरकारची बदनामी करण्याचे धोरण भाजपाने आखले आहे. वाझे प्रकरणात मी स्वतः म्हटले होते की, माझ्याकडे जर अधिकार असते तर आपण सर्वात आधी परमबीर सिंग यांनाच अटक केली असती. कारण पोलिस मुख्यालयातून जे सीसीटीव्ही फुटेज गायब झाले होते. त्यामध्ये परमबीर सिंग हेच कारणीभूत होते. जस जसे राज्य सरकार या दृष्टीने चौकशी करू लागले, तसे हे प्रकरण सीबीआयने घेतले, त्यानंतर ते ईडीकडे गेले. राज्य सरकारच्या हातून हे प्रकरण काढण्यात आले. अशा प्रकारे राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी केंद्र सरकारने आयपीएस अधिकाऱ्याचा वापर केला, हे बाहेर येऊ नये, म्हणून परमबीर सिंग यांना पळून जाण्यासाठी केंद्राने मदत केल्याचे पटोले म्हणाले. सीसीटीव्ही फुटेज गायब झाले, त्यानंतर मनसुख हिरेन यांच्या खून झाला, या सर्व प्रकरणात परमबीर सिंग यांचा आहे, तसे खुलासे समोर आले होते. यात सरकारमधील कोणतेही मंत्री सहभागी नव्हते. भाजप महागाई, बेरोजगारी, सुरक्षा या सर्व मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी किरीट सोमय्या यांच्यासारखे नेते बडबड करत असतात, असेही पटोले म्हणाले.
(हेही वाचा : शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या नावाखाली शहरांचा घोटला गळा!)
Join Our WhatsApp Community