अधिवेशनावर कोरोनाचे सावट, विधानसभा अध्यक्षांनाच कोरोना

169

विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबर रोजी होणार असून, अधिवेशनाच्या दोन दिवस आधी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील कोरोनामुळे वेळेआधी स्थगित करावे लागले होते. तसेच कोरोनाच्या सावटामुळे पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचे घेण्याचा निर्णय झाला आहे. मात्र आता विधानसभा अध्यक्षांनाच कोरोनाची लागण झाल्याने अधिवेशनाचे काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

नाना पटोले यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. ‘गेली अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली आणि ती चाचणी पॉझिटिव्ह आली. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन असे विधानसक्षा अध्यक्षांनी म्हटले आहे.

सुनील केदार यांनाही कोरोना

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सुनील केदार यांना गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवत होती. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लक्षणे असल्याने त्यांना  मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.