Nana Patole यांना सत्तेची मस्ती आली आहे का ?; पाय धुवून घेण्याच्या प्रकरणावरून चौफेर टीका

अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी म्हणाले, Nana Patole यांनी स्वतःला संत समजू नये. पटोले यांना सत्तेची मस्ती आली आहे का ?, असा प्रश्न मिटकरी यांनी विचारला आहे.

262
कार्यकर्त्याला पाय धुवायला लावणे हे Nana Patole यांच्या सरंजामी वृत्तीचे दर्शन; रेखाताई ठाकूर यांची टीका

काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे चिखलाने माखलेले पाय पक्षातील कार्यकर्त्यांनी हाताने धुतले. अकोला (Akola) जिल्ह्यातील वाडेगाव येथे संत गजानन महाराज पालखी सोहळ्याला भेट देण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. भाजपा आणि अजित पवार गटातील नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी म्हणाले, पटोले यांनी स्वतःला संत समजू नये. पटोले यांना सत्तेची मस्ती आली आहे का ?, असा प्रश्न मिटकरी यांनी विचारला आहे.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार ?, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारमध्ये मोठ्या हालचाली)

कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्यामुळे नव्या वादाला तोंड

अकोल्यातील वडेगाव येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हजेरी लावली. या वेळी पटोले यांची लाडूतुला करण्यात आली. या ठिकाणी १७ जून रोजी झालेल्या पावसामुळे पालखी सोहळ्याच्या ठिकाणी चिखल झाला होता. या वेळी पटोले चिखलातून मार्ग काढत संत श्री गजानन महाराजांच्या पालखीजवळ गेले आणि त्यांनी दर्शन घेतले. मात्र मैदानावरील चिखलामुळे पटोले यांचे पाय चिखल-मातीने माखले होते. ते नागपूरकडे रवाना होण्यासाठी त्यांच्या वाहनाकडे गेले. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाणी आणले आणि त्यांचे पाय धुतले. पटोले यांनी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

हा लोकशाहीचा आणि त्या कार्यकर्त्यांचा अपमान

अजित पवार (Ajit Pawar) गटातील आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीदेखील यावरून पटोले यांच्यावर टीका केली आहे. याविषयी पुढे बोलतांना मिटकरी म्हणाले की, वारकरी संप्रदायात एकमेकांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करण्याच्या प्रथेबद्दल मी ऐकलं होतं. परंतु, लोकांकडून पाय धुवून घेण्याचा प्रकार मी पहिल्यांदाच पाहिला. अशा प्रकारे जर नेते त्यांच्या कार्यकर्त्यांना वापरून घेऊन त्यांच्याकडून आपले पाय धुऊन घेत असतील, तर ही निंदाजनक गोष्ट आहे. यावरून लक्षात येते की, त्यांच्या पक्षाची नेमकी धारणा काय आहे. ही एक संतापजनक घटना आहे. नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणे हा लोकशाहीचा आणि त्या कार्यकर्त्यांचा अपमान आहे.

मी नाना पटोलेंना (Nana Patole) एवढंच सांगेन की, त्यांनी स्वतःला संत समजू नये आणि कार्यकर्त्यांना नोकर समजू नये. कार्यकर्त्यांनी देखील एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, लोकशाहीत कोणीही मालक नसतो. त्यामुळे उत्साहाच्या भरात कोणीही असले कृत्य करू नये. एवढी मी विनंती करतो. त्याचबरोबर ही सत्तेची मस्ती होती का, असा प्रश्न मला नाना पटोले यांना विचारायचा आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.