काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांवर जहरी टीका केली आहे. संजय राऊतांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचा उल्लेख करून काँग्रेसमध्ये निर्णय राहुल गांधी किंवा गांधी कुटुंब घेत असल्याचे वक्तव्य केल्याबाबत नाना पटोलेंना विचारणा झाली. यावर नाना पटोलेंनी संजय राऊतांनी चाटूगिरी आणि चोंबडेपणा करू नये, अशा शब्दांत सुनावले.
संजय राऊतांनी चाटूगिरी करू नये. ते काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत. गांधी परिवारावर हे लांच्छन लावणे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. गांधी परिवार त्यागाचा परिवार आहे. पंतप्रधानपद त्या कुटुंबाने सोडले आहे. राहुल गांधींनी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडले आहे. मल्लिकार्जून खरगे हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा मोठा अनुभव आहे. ते अनेक वर्ष आमदार-खासदार होते. संघटनेत मल्लिकार्जून खरगे ब्लॉक अध्यक्षापासून काम करत आले आहेत. त्यांना संघटनेचा मोठा अनुभव आहे. मल्लिकार्जून खरगेंच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेणे आणि गांधी परिवारावर चुकीचा आरोप करणे म्हणजे चोमडेपणा आहे. संजय राऊतांनी हा चोमडेपणा थांबवावा. हे चुकीचे आहे. ते अशाप्रकारे दुसऱ्यांचे प्रवक्ते होतात, अशी टीका नाना पटोलेंनी Nana Patole केली. दरम्यान दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनीही संजय राऊतांना त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते होऊ नका असे सांगितले. त्यांनी आमच्याही पक्षात फार चोमडेपणा करू नये, असाच आमचा सल्ला आहे, असेही पटोलेंनी राऊतांना सुनावले.
(हेही वाचा Mahavikas Aghadi : वज्रमूठ सभेबाबत काँग्रेसमध्ये साशंकता; काय म्हणाले नाना पटोले?)
Join Our WhatsApp Community