राजकीय वजन वाढवण्यासाठी Nana Patole क्रिकेटच्या मैदानात

119

लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसला राज्यात अपेक्षेपेक्षा अधिक जागा मिळाल्या असल्या तरी दिल्लीत राजकीय वजन वाढवण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यासाठी पटोले यांनी क्रिकेटचा आधार घेतला असून आता प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

तीन माजी मुख्यमंत्र्यांनी भूषवले अध्यक्षपद

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष दिवंगत मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख आणि माजी मंत्री, मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार या राजकीय व्यक्तींनी यापूर्वी ‘एमसीए’चे अध्यक्षपद भूषवले आहे. यातील शेलार वगळता अन्य तिघे राज्याचे माजी मुख्यमंत्री असून पटोले यांना एमसीएच्या अध्यक्षपदाची भुरळ पडली असल्याची चर्चा होत आहे.

यासाठी त्यांना मुंबईतील एखाद्या क्रिकेट क्लबचे अध्यक्ष होणे गरजेचे होते, तसे त्यांनी माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व करण्यास नुकतीच सुरुवात केली आहे. विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनीही पूर्वी माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व केले आहे.

(हेही वाचा legislative Assembly: पेपरफुटीच्या गुन्ह्यासाठी  १० वर्षांचा तुरुंगवास आणि १ कोटी रुपये दंडाची तरतूद, विधेयक विधानसभेत सादर)

कोण मतदान करणार?

मुंबईत 32५ हून अधिक क्रिकेट क्बल असून या क्लबचं नेतृत्व ‘एमसीए’कडे आहे. मुंबईतील क्लबचा  प्रत्येकी एक सदस्य एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करतो. तसेच मुंबईतील राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या ४०  खेळाडूंनाही मतदानाचा हक्क आहे. गेल्या निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलार पॅनेलचे अमोल काळे आणि माजी क्रिकेटर संदीप पाटील यांच्यात लढत झाली होती, त्यात अमोल काळे  यांनी पाटील यांचा २५ मतांनी पराभव केला होता. दुर्दैवाने, काळे यांचे नुकतेच निधन झाल्याने २३ जुलैला अध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक होत आहे.

‘होमपिच’ भंडाऱ्यात लागले बॅनर्स

नाना पटोले (Nana Patole) आता एमसीए अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून पटोले यांच्या ‘होमपिच’वर भंडाऱ्यातही आता पटोले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होणार असल्याच्या आशयाचे बॅनर झळकू लागले आहेत. भंडाऱ्यात समाज जिल्हा परिषदेचे मदन रामटेके यांनी ‘नानाभाऊ मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होणार’ असे बॅनर्स लावले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.