Nana Patole आमचे मित्र; मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्याने संशयकल्लोळ

107

राज्याच्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या अंतिम दिवशी राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर खुमासदार शब्दांत टीका करताना सभागृहातील वातावरण हसते खेळते बनले. मात्र यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याविषयी जे वक्तव्य केले, त्यामुळे नाना पटोले यांच्याविषयी संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात म्हणाले, विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचे आव्हान होते. पण, त्यांना मतदारांनीच घरी बसवल्यामुळे दुसरे कोणी तुमच्यापुढे उभे राहायलाच तयार नाही, असं म्हणताना शिंदेंनी ‘नाना बरोबर ना?’, असा मिश्किल सवाल केला. नाना पटोले (Nana Patole) यांनी अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केले आणि तिथून गाडी सुरू झाली. मग ती गाडी अशी…’ आपले वाक्य लांबवत, ‘याचं क्रेडिट नाना तुम्हालाच आहे. किती नाही म्हटले तरी तुम्हाला क्रेडिट आणि आम्ही हे खरं मानतो. त्यामुळे नाना आमचे खरे मित्र आहेत. मीडियासमोर काही बोलत असतील ते जाऊद्या. पण, नाना ना ना म्हणत असले तरी त्यांचं आमच्यावर प्रेम आहे…सुरुवात कुठून झाली ते सांगायला नको?’ असं शिंदे म्हणताच नानांनाही हसू आवरले नाही. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी, ‘ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे..’ असे गाण्याचे बोल म्हटल्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ‘ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे… त्यामुळे आम्ही मूळ विसरत नाही, असे म्हणाले.

(हेही वाचा BJP vs Congress : जॉर्ज सोरोसशी काँग्रेसचे मजबूत संबंध; भाजपाचा आरोप)

त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नाना पटोले (Nana Patole) राजकारणात काहीही बोलत असतील आमच्याशी वैचारिक मतभेद असतील, पण आमची त्यांच्याशी खरी मैत्री आहे. ते आमचे मित्र आहेत, असे म्हणाले. स्वतः नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात माध्यमांशी बोलताना, देवेंद्र फडणवीस हे माझे पूर्वीपासूनच चांगले मित्र आहेत. आमची मैत्री जगजाहीर आहे, अशी कबुली दिली होती. विधानसभा निवडणुकीत मविआचा सुपडासाफ झाला. त्यावेळी विदर्भातील काँग्रेस नेत्याने ‘नाना पटोले (Nana Patole)यांचे रा.स्वयंसेवक संघाशी संबंध असल्याने या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला, असे म्हटले. एकूणच आधीपासूनच नाना पटोले यांच्याविषयी संशयाचे वातावरण होते, आता तर विधान मंडळाच्या अधिवेशनात पटोले यांच्या मैत्रीविषयी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उघडपणे भाष्य केल्याने नाना पटोले (Nana Patole) यांच्याभोवती संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.