अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस पाठिंवा देणार, अशा बातम्या असतांनाच काँग्रेसने अकोल्यात उमेदवार दिला. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) पुन्हा ऑफर दिली आहे.
“प्रकाश आंबेडकर आणखी रस्ते बंद झाली नाहीत. मी पुढाकार घेतो. तुमच्या भूमीत येऊन सांगतो. नामांकन मागे घेईपर्यंत वेळ आहे. किती जागा पाहिजे, ते सांगा. 2-3 किती पाहिजे ते सांगा; पण भाजपला पराभूत करण्यासाठी समोर या. अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत वेळ आहे. मग पुढची लढाई सुरू होईल. मैदान सुरू झालं तर खुप मुद्दे आहेत, आयुध आहेत”, असे आवाहन नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिले आहे.
(हेही वाचा – Sanjay Nirupam : काँग्रेसला सोडणाऱ्या संजय निरुपम यांची काय आहे राजकीय कारकीर्द?)
महाविकास आघाडीतील घटक पक्षांत एकमत नाही, हे पहिल्या दिवसापासूनच दिसून येत होते. आता नाना पटोले आणि प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप करत आहेत, ते पहाता विरोधकांमध्ये एकजूट नाही, हेच दिसून येते.
पक्षश्रेष्ठींशी मी बोलेन
नाना पटोले पुढे म्हणाले की, तुम्ही म्हणता नाना पटोलेला अधिकार नाहीत. मी स्वत:च्या बळावर सांगतो की, सोबत या. पक्षश्रेष्ठींशी मी बोलेन. प्रकाश आंबेडकरजी अद्याप वेळ गेलेली नाही. 2014 आणि 2019 या दहा वर्षाच्या कालावधीत मतांचं मोठं विभाजन झालं होतं. फुले-शाहू-आ़ंबेडकरांच्या महाराष्ट्रात मतांचं विभाजन करण्याचे षडयंत्र भाजपने नेहमीच रचलं. माझ्या पोटनिवडणुकीत आंबेडकरांनी उमेदवार दिला. मी भाजपा सोडला, तेव्हापासून प्रकाश आंबेडकरांनी माझा राग करणं सुरू केलं. आंबेडकरांनी मुंबईतील संविधान बचाव रॅलीत माझा अपमान केला. आंबेडकर खर्गेंना कधीच भेटले नाहीत. आंबेडकरांनी माझ्या नावाने चुकीचे आरोप केलेत. आंबेडकरांनी माझा अपमान केला. आम्ही शेवटपर्यंत त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. माझे सर्वच पक्षात मित्र, देवेंद्र फडणवीसही माझे मित्र आहेत, असेही नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community