MCAच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिग्गजांची ‘फिल्डिंग’

199

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष अमोल काळे यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यामुळे हे पॅड मागील काही दिवसांपासून रिक्त आहे. आता या पदासाठीची निवडणूक २३ जुलै रोजी पार पडणार आहे. त्यासाठी राज्यातील दिग्गजांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे.

या निवडणुकीसाठी बुधवार, १० जुलै रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांचा पुत्र विहंग सरनाईक आणि सध्या एमसीएच्या सचिव पदावर असलेले अजिंक्य नाईक या अर्ज दाखल केला आहे. या तिघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. यासाठी नाना पटोले यांच्यासाठी खुद्द शरद पवार फिल्डिंग लावतील, तर सरनाईक यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रयत्नशील असतील. तर अजिंक्य नाईक स्वतः एमसीएमध्ये (MCA) कार्यरत असल्याने त्यांचे स्वतःचे वजन आहे. अशा स्थितीत कोण बाजी मारणार हे पहावे लागणार आहे.

(हेही वाचा Mumbai Rains : मुंबईतील त्या भागांमध्ये पाणी का तुंबले? आपत्कालिन व्यवस्थापन प्राधिकरणांची बोलावली बैठक)

MCA चे काय आहे महत्व? 

मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ही मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे आणि नवी मुंबईसारख्या क्रिकेटची प्रशासकीय संस्था आहे. एमसीएच्या कार्यक्षेत्रात पश्चिम उपनगरामधील डहाणू, मध्य उपनगरातील बदलापूर आणि खारघर तसेच नवी मुंबईचा समावेश आहे. एमसीए मुंबई क्रिकेट संघाचेही संचालन करते आणि मुंबई जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा आयोजित करते. एमसीचा मुंबई संघ भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात प्रबळ संघ म्हणून ओळखला जातो. मुंबई क्रिकेट संघाने विक्रमी 41 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे. विजय मर्चंट, सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांसारखे टीम इंडियाचे दिग्गज खेळाडूही एमसीएच्या संघाकडून खेळले आहेत. मुंबईचा संघ ऐतिहासिकदृष्ट्या बॅटिंग पॉवरहाऊस म्हणून ओळखला जातो.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.