काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उददेशून घाणेरडी टीका केली असून, पटोलेंनी पुन्हा एकदा वाद ओढावून घेतला आहे. रविवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्या वक्तव्यानंतर भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाली असून, त्यांचा राज्यभर तीव्र विरोध केला जात आहे. भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पटोलेंवर पलटवार करत, पटोले हे मनोरुग्ण आहेत का? असा सवाल केला आहे.
भाजपाचे आंदोलन
नाना पटोले यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना “ज्याची बायको पळून जाते, त्याचे नाव मोदी ठरते,” असं आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर, त्यांच्या विरोधात भाजप आंदोलन करत आहे. सोमवारी पुण्यात भाजप शहरच्यावतीने अलका चौकात नाना पटोलेंच्या निषेधात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनात भाजपचे पुणे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( हेही वाचा: पुणे महामार्गावरील भीषण अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू!)
दुस-यांदा केले बेताल वक्तव्य
जगदीश मुळीक म्हणाले,काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातील बेताल वक्तव्य हे दुसऱ्यांदा केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असे बोलणे हे नाना पटोले यांच्या वक्तव्याला शोभत नाही. नाना पटोले हे मनोरुग्ण आहेत का? असा आम्ही सवाल उपस्थित करत आहोत. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागितली पाहिजे. नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध आम्ही या आंदोलनातून करत आहे, असे जगदीश मुळीक म्हणाले
Join Our WhatsApp Community