निकालाच्या पूर्वसंध्येला Nana Patole यांच्या वक्तव्याने खळबळ; म्हणाले, मी आणि देवेंद्र फडणवीस…

गुरुवारी मुंबईत खासदार संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांची महत्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीत नाना पटोले हे अनुपस्थित होते.

174

विधानसभा निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला महायुती आणि माविआ या दोन्हींकडून सत्ता स्थापनेच्या दृष्टीने काय काय पर्याय आहेत, याची चाचपणी करणे सुरु झाले आहे. सगळ्या शक्यता लक्षात घेऊन दोन्ही बाजूंचे नेतेमंडळी त्या त्या दृष्टिकोनातून प्रयत्नरत झाले आहेत. अशातच काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)  यांनी जे वक्तव्य केले आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे.

एकीकडे महाविकास आघाडीचे नेते आमचंच सरकार स्थापन होईल असा दावा करत आहेत, तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांकडूनही दावा करण्यात येत आहे. मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलने राज्यात महायुतीला जास्त जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुती आणि महाविकास आघाडीला सत्तास्थापनेसाठी अपक्षाची मदत लागू शकते. त्यामुळे नेमकी सरकार कोण स्थापन करणार? हे शनिवारी स्पष्ट होईल. असे असले तरी निकालाच्या आधी मुंबईत मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. एकीकडे महायुतीच्या बैठकांचा धडाका सुरु आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरु आहेत. गुरुवारी मुंबईत खासदार संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांची महत्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीत नाना पटोले हे अनुपस्थित होते. त्यामुळे नाना पटोले (Nana Patole) यांनी या बैठकीला जाणीवपूर्वक दांडी मारली का, याविषयी तर्कवितर्क लावले जाऊ लागले आहेत. यानंतर शुक्रवारी नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. मात्र, याचवेळी नाना पटोले यांनी, “मी आणि देवेंद्र फडणवीस नागपूरवरून मुंबईला बरोबरच जाणार आहोत’, असे वक्तव्य केले. त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाना पटोले यांनी माझी आणि देवेंद्र फडवणीस यांची मैत्री याआधी होती आणि आजही आहे, हे सगळ्यांना माहित आहे. राजकारणाच्या पलीकडील आमची मैत्री आहे, असे पटोले (Nana Patole) यांनी जाहीरपणे सांगितले होते.

(हेही वाचा Maharashtra Assembly Election Result : निकालानंतरही Nana Patole यांचा एकांगी लढा कायम राहणार!)

तत्कालीन मविआ सरकार कोसळण्यामागे होते कारणीभूत 

२०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर (Maharashtra Assembly Election Result) उद्धव ठाकरे यांच्यामुळे भाजपाने सर्वाधिक आमदार निवडून आणूनही भाजपाचे सरकार न येता शिवसेना दोन्ही काँग्रेससोबत गेल्याने महाविकास आघाडीचे सरकार आले. या निवडणुकीत काँग्रेस चौथ्या क्रमांकावर होता तरीही सत्तेत आला. त्यावेळी नाना पटोले (Nana Patole) यांना मंत्रिपदाची आशा होती पण त्यांना त्यांच्या मर्जीविरुद्ध विधानसभा अध्यक्ष बनवले. मविआच्या एक वर्षाच्या कालावधीनंतर पटोले यांनी ४ फेब्रुवारी २०२१ रोजी विधानसभा अध्यक्षपदाचा परस्पर राजीनामा दिला. त्यानंतर नाना पटोले २९ जून २०२२ रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले. पण काँग्रेसने पुढील दीड वर्षे विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार दिला नाही. याची जबाबदारी पटोले यांचीच होती. विधानसभा अध्यक्षपद रिक्त राहिल्याने पुढे एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांना फोडून केलेले बंड रोखण्यात मविआला पर्यायाने उद्धव ठाकरेंना यश आले नाही. कारण शिवसेना सोडून गेलेले आमदार यांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षच अस्तित्वात नसल्यामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला. तर उद्धव ठाकरे यांना वेगळा पक्ष काढावा लागला. शिवसेनेतील हे बंड यशस्वी होण्याला नाना पटोले कारणीभूत आहेत, असे आरोपही झाले.

उबाठाला अंगावर घेणारा नेता

काँग्रेसचा अध्यक्ष बनल्यानंतर नाना पटोले यांनी काँग्रेसचा टेकुसारखा वापर करण्यासाठी नव्हे, तर सत्तेतील प्रमुख पक्ष बनवण्याच्या दृष्टीने व्यूहरचना आखायला सुरुवात केली. याचा प्रत्यय लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये जागा वाटपात आला. मविआतील घटक पक्ष उबाठा आणि राष्ट्रवादी (श.प.) यांच्या दबावापुढे न झुकता सर्वाधिक जागा पदरी पाडून घेतल्या आणि निकालातही मविआ आणि महायुतीतील घटक पक्षांमध्ये सर्वाधिक जास्त खासदार काँग्रेसने निवडून आणले. नाना पटोले (Nana Patole) पक्षाचे अध्यक्ष असतानाच काँग्रेस मविआमध्ये राज्यात चौथ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर पोहोचली, भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष फोडले पण काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण वगळता मोठे भगदाड पाडता आले नाही. लोकसभेत बऱ्यापैकी खासदार निवडून आणले. या उपलब्धीमुळे काँग्रेसच्या हायकमांडच्या नजरेत नाना पटोले यांचे वजन वाढले आहे.

विधानसभा निवडणुकीतही (Maharashtra Assembly Election Result) जागा वाटपात नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळाव्यात म्हणून जोर लावला. त्यावेळी उबाठाने ज्या ज्या जागा मागितल्या, त्याला विरोध केला. हा विरोध इतका विकोपाला गेला की, मविआमध्ये फूट पडणार, अशी परिस्थिती निर्माण झाली. लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीत नाना पटोले यांचीच छाप दिसली. काँग्रेस विधानसभा निवडणुकीत १०१ जागा लढवत आहे. जागा वाटपात नाना पटोले (Nana Patole) शंभराहून अधिक जागा मिळाव्यात आणि उबाठाला शंभरापेक्षा कमी जागा मिळाव्यात यावर अडून राहिले, त्यासाठी त्यांनी संजय राऊतांनाही गप्प केले. मातोश्रीला झुकवले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.