नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये येताच चीन आक्रमक, आशिया खंडावर युद्धाचे सावट

आधीच रशिया विरुद्ध युक्रेनसोबत युद्ध संपता संपत नसताना आता जगात या युद्धाची व्याप्ती वाढवणारी घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला कारण आहे अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांचा तैवान दौरा. या दौऱ्यामुळे चीन आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. अमेरिका तैवानशी जवळीक साधत असल्याने चीनचा तिळपापड झाला असून चीन आक्रमक बनला आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात तैवानमुळे अनेक वर्षांपासून तणाव आहे.

अमेरिका चीनचेही रशिया करणार 

तैवानमध्ये नॅन्सी पेलोसींचे स्वागत करण्यासाठी तिथल्या सरकारने मोठी तयारी केली आहे. नॅन्सी पेलोसी यांचे विमान तैवानच्या हद्दीत प्रवेश करताच चीनने तैवानचे तैपेई विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. चीनने या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. गेल्या एका दशकापासून तैवानच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिकेमध्ये मोठा तणाव आहे. तो आता शिगेला पोहोचल्याचे दिसून आले आहे. सद्यस्थितीला अमेरिकेसमोर चीन आणि रशिया हे मोठे शत्रू आहेत. रशिया आता युक्रेनच्या युद्धामध्ये गुंतला असून हे युद्ध लांबल्यास रशियाची आर्थिक परिस्थिती ढासळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अमेरिकेसमोर आता चीन एक एकमेव मोठा स्पर्धक राहिला असून तोदेखील कोणत्या तरी युद्धात गुंतला तर त्याचाही विकास मंदावेल अशी काहीसी स्ट्रॅटेजी अमेरिकेची आहे. त्या दृष्टीने तैवान हा अमेरिकेच्या हातात एक कोलितं असून त्यामुळे चीन युद्धात गुंतू शकतो, अशाही पद्धतीचे धोरण असल्याचे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक यांचे म्हणणे आहे. नॅन्सी पेलोसी यांच्या पूर्व आशियाच्या दौऱ्यावरून चीनने या आधीच एक निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यात म्हटले होते की, चीन आपल्या संरक्षणासाठी तयार आहे. अमेरिकेने तैवानच्या स्वातंत्र्यावर बोलणे बंद करावे. तैवान हा चीनचा एक भाग असून अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आपल्या वचनाचे पालन करावे. चीनच्या ‘वन चायना पॉलिसी’चा अमेरिकेने आदर करावा.

(हेही वाचा खडसेंना खोटे बोलणे मोजणाऱ्या मशीनसमोर उभे करा, मशीन बंद पडेल! आमदार मंगेश चव्हाणांचा हल्लबोल )

तीन दिवस सुट्या रद्द

तैवानमध्ये नॅन्सी पेलोसी यांच्या दौ-यामुळे चीन आक्रमक बनला आहे. त्यामुळे तैवान सतर्क झाला आहे. तीन दिवस तैवानने सुट्या रद्द केल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here