राणेंची अटक पण अनिल देशमुख मात्र मोकाट! ट्विटरवर सुरु झाला ट्रेंड

108

केंद्रीय नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयीअवमानकारक वक्तव्य केले, त्यामुळे नाशिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर मंगळवारी, २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली. त्यानंतर मात्र लागलीच १०० कोटीची वसुली केल्याचा आरोप असलेले आणि ईडीच्या ५ नोटिसा मिळूनही देशमुखांना अटक केव्हा करणार, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली जाते, पण ईडीने १५ समन्स दिले तरी अटकेबाबत विसरा, असे नेटकरीची म्हणत आहेत.

https://twitter.com/sraj2890/status/1430102565908221954?s=20

(हेही वाचा : नारायण राणे यांना अखेर अटक!)

भ्रष्टाचारी आरोपी अनिल देशमुख ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष करत आहेत आणि मोकाट फिरत आहेत. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे मात्र केवळ त्यांच्या वक्तव्यावरून त्यांना अटक करण्यात आली आहे.

https://twitter.com/nobuddy772100/status/1430121921937502211?s=20

जनतेचा कोट्यवधींचा पैसा लुटण्यापेक्षा उद्धव ठाकरेंवर टीका करणे मोठा गुन्हा आहे.

जर अनिल देशमुख यांना अटक केली तर ते बरेच काही उगळतील. त्यामुळे लक्षात घ्या अनिल देशमुख यांना पाठिंबा देण्यासाठी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

https://twitter.com/umparki7/status/1430124709690044423?s=20

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.