वैयक्तिक टीका करणे थांबवा अन्यथा प्रहारमधून लिहायला सुरुवात करेन, अशी टीका केंद्रीय सुक्ष्म, लघू, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून होत असलेल्या टीकेवर नारायण राणे यांनी जोरदार प्रहार केला असून, आता स्वत:च्या प्रहार पेपर मधूनच लिहायला सुरुवात करेन, असा इशारा त्यांनी दिला आहे.
नेमकं काय म्हणाले राणे?
आता हे सर्व बस्स करा, जर संजय राऊत थांबले नाहीत तर मी पण प्रहारमधून लिहायला सुरुवात करेन. कोण कुठे बसतो, काय करतो याचा गौप्यस्फोट करेन असा इशाराचा राणेंनी दिला आहे. परिवहन मंत्री अनिल परब कितीही लपून काहीही करत असले तरी त्यांचे कारनामे कॅमेऱ्यावर आले असल्याचे देखील राणे यांनी सांगितले.
(हेही वाचाः राणेंमुळे फडणवीस मागे पडले… राऊतांचे मत)
राऊतांच्या टीकेला राणेंचे हे उत्तर
नारायण राणे यांच्या राजकीय कारकीर्दीचे सगळ्यात जास्त नुकसान त्यांच्या मुलांनी केले आहे. ठाकऱ्यांपासून पवारांपर्यंत, राहुल गांधींपासून मोदींपर्यंत सगळ्यांचे आईबाप काढणाऱ्या राणेंच्या मुलांनी त्यांच्या पिताश्रींचे नुकसान केल्याची टीका संजय राऊत यांनी केली. या टीकेला नारायण राणे यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये जोरदार उत्तर दिले आहे. माझी दोन्ही मुले चांगली आहेत, मात्र तुमच्या मुलांचे पराक्रम आधी बघा. मग आमच्यावर बोला, असा दमच राणेंनी भरला. तोंडावर भेटल्यावर चांगले बोलायचे. लेखणी हातात आली आणि वरुन फोन आला तर ये रे माझ्या मागल्या करायचे हे धंदे सोडा, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला.
(हेही वाचाः राणेंची यात्रा म्हणजे येड्यांची जत्रा… राऊतांची सामनातून ‘रोखठोक’ टीका)
Join Our WhatsApp Community