उद्धव ठाकरे यांनी फक्त टीका करण्याची काम केली, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्गाला कोकणाला काय दिल? विकासाला पुरेसे पैसे देखील दिले नाहीत. कोकणात यायचं, मासे खायचं आणि जायचं एवढंच काम त्यांनी केलं अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली. आक्रमकता आणि उद्धव यांचा संबंध काय? ठाकरे यांच्यात आक्रमकता होती तर नारायण राणे, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे यांची गरज काय होती? बाळासाहेब ठाकरे गेले आणि शिवसेना संपली असही ते म्हणाले.(Narayan Rane)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरबंजारा समाजाचे दोन हजार कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थित हा प्रवेश झाला. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.(Narayan Rane)
(हेही वाचा : Temple Liberation Fight : अयोध्या तो बस झांकी है… काशी-मथुरा बाकी है!)
गोरबंजारा समाजाला धमकी दिल्यास राणेंशी गाठ
पुढे बोलताना ते म्हणाले की, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करताना नारायण राणे म्हणाले की राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक, सुधाकर नाईक यांचं नाव न घेता त्यांच्यावर राणे यांनी टीका केली. ते म्हणाले की नाईक तुमच्या समाजाचे नाहीत. नऊ वर्षात काही काम केलं नाही.जिल्हा, राज्य आणि देशाच्या दृष्टीने वैभव नाईक या विद्वानाने कोणते विचार दिले? सभागृहात कधी उठून बोलला नाही, यापुढे गोरबंजारा समाजाला धमकी दिल्यास राणेंशी गाठ आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community