शिवसंपर्क नाही, तर शिव्यासंपर्क! फेरीवाल्यांना आणून सभेला बसवलेले! नारायण राणेंचा घणाघात

90

हा कसला मुन्नाभाई हा तर केमिकल लोचा, अशी मुख्यमंत्र्यांची राज ठाकरे यांच्यासंबंधी भाषा! ही भाषा कुणाला नात्यातल्या लोकांना वापरतात, शोभते का त्यांना. त्यांना नवाब भाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाही. बॉम्बस्फोटाशी संबंधित लोकांनी ज्यांचे संबंध होते अशा नवाब मलिकांशी यांचे संबंध आहेत. मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनवले, उद्धव ठाकरे असतानाही बनवले. उद्धव ठाकरे अजून कितीही काळ मुख्यमंत्री म्हणून राहिले तरी माझ्या मुख्यमंत्री काळातील ८ महिन्यांच्या कामाशी बरोबरी होऊ शकत नाही. बोलणे, चेष्टा करणे सोपे असते, शिवसंपर्क नाही तर शिव्या संपर्क भाषण, फेरीवाल्यांना आणून बसवले होते, शिवसेनेशी काय त्यांचा संबंध, असा घणाघाती हल्ला केंद्रीय मंत्री नारायण राणे याची केला. शिवसेनेच्या सभेतील उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर मंत्री राणे बोलत होते.

मुंबई तोडण्याचा डाव पूर्वी काँग्रेसचा वाटायचा 

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव जेव्हा भाजपसोबत होते तेव्हा हा डाव काँग्रेसचा होता, जेव्हा काही हातात नसते तेव्हा त्यांना दोन गोष्टी आठवतात मुंबई तोडण्याचा डाव आणि हिंदुत्व. एकदा शरद पवारांना विचारले होते साहेब म्हणतात आमच्यासोबत या तेव्हा ते म्हणाले होते शक्य नाही आमचा पक्ष राहणार नाही आता काय पक्षाचे, असा सवालही राणे यांनी शरद पवार यांना विचारला. गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी किती जणांच्या चुली पेटवल्या हे सांगावे, तुम्ही चुली पेटवणारे नाही तर चुली उद्धवस्त करण्याचे काम केले आहे. मराठी तरुणाच्या हातात दगड दिले अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणण्याची लाज वाटते असाही टोला त्यांनी लगावला. दिशा सॅलियन आणि सुशांत सिंह यांना ठार मारले, यांनी जया जाधव आणि रमेश मोरे यांना का मारले याची उत्तरे द्यावे, असे नारायण राणे म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, मी जवळपास 39 वर्ष शिवसेनेत होतो. कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवणारे एकमेव नेतृत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आता राज्याचे मुख्यमंत्री काय आणि कुठल्या भाषेत बोलू शकतात याचा अंदाज राज्यातील जनतेला आला आहे. कोण चूल पेटवत? तुम्ही अडीच वर्षात किती लोकांच्या चुली पेटवल्या? किती लोकांना नोकऱ्या दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या असंस्कृत भाषणाला उत्तर देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे.

(हेही वाचा …आणि मुरारबाजी देशपांडेंचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले!)

हिंदुत्व टोपीत नाही डोक्यात असावे लागते

नारायण राणे म्हणाले की, 14 तारखेला फार मोठा गवगवा करून मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली. शक्ती प्रदर्शन घेण्यासाठी सभा घेतली, पण सभा किती भरली आणि त्याला खर्च किती आला असेल याचा अंदाज नागरिकांना आला आहे. मुख्यमंत्री पदावर असताना जाहिरातबाजी करून सभा घ्यावी लागली. यांना मुख्यमंत्री म्हणण्याची लाज वाटते. आतापर्यंत असंख्य मुख्यमंत्री झाले, त्यांनी राज्याची प्रतिमा वाढवायचे काम केले. हा इतिहास असताना परवाचे भाषण ऐकून वाईट वाटलं. हे अपेक्षित नव्हते. नारायण राणे मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हणाले की, मुलगा म्हणून साहेबांना विश्वासदेखील दिला नाही. हिंदुत्व टोपीत नाही डोक्यात असावे लागते, असे ते म्हणाले. मग 2019 का गेले तुमच्या डोक्यात. यांच्या हृदयात राम आहे की रावण? हे रामही नाही रावणही नाही. यांच्याकडे विकृत बुद्धीची लोक आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाबद्दल बोलता, पण तुमचा चेहरा आरशात बघा, आम्ही तुम्हाला काय म्हणायचे?

भाजप हातात धोंडे नाही तर विचार देतो

भाजप हातात धोंडे देत नाही तर विचार देतो, केवळ नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यामुळे यांचे आमदार ५६ आहेत, नाहीतर यांचे खासदार कधी ८ आणि आमदार संख्या २० च्या वर गेली नाही. यांचे मुंबईत एकाचे दोन बंगले झाले आणि मुंबईतून मराठी मुंबई बाहेर गेला आहे. कुणाला नोकरी दिली कुणाला घरे दिली सांगा. शिव्या देणे एककलमी कार्यक्रम सुरु केला आहे. यशवंत जाधववर कारवाई सुरु आहे, २० हजार कमावू शकत नाही आज कोट्यवधी मालमत्ता जमली आहे. अनिल परब कुठे होता आज कुठे पोहचला आहे, असेही नारायण राणे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.