फडणवीसांवर बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी आहे का; नारायण राणेंचा घणाघात 

उद्धव ठाकरे एक नंबरचा खोटारडा, दगाबाज माणूस आहे, असे नारायण राणे म्हणाले.

127

उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केले ते अत्यंत असभ्य आणि शिवराळ होती, मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीकडून अशी भाषा वापरण्यात आली. त्यांनी मुख्यमंत्री पदावर असताना कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले होते याचा विसर पडला आहे. सुशांत सिंग राजपूत याला का मारले, दिशा सालियन हिने आत्महत्या का केली, सचिन वाझे हा उद्धव ठाकरे यांचा जावई होता का, निलंबित असताना नोकरीवर ठेवले आज जेलमध्ये आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात नवाब मलिक यांचे कुख्यात गुंडांशी संबंध होते, त्याच्या मंत्रिमंडळातील दोन गृहमंत्री जेलमध्ये गेले, असा मुख्यमंत्री फडणवीस आणि मोदींवर बोलतात. त्यांची लायकी आहे का, असा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.

हिंदुत्वाचा त्याग केला म्हणून मुखमंत्री पद मिळाले   

‘सामना’ला वृत्तपत्र म्हणणार नाही, त्यात देशहिताचे, समाजहिताचे काय असते हे सांगावे, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी असे वृत्तपत्र चालू राहावे का हे पहावे, आपण प्रेस कॉउंसिलकडे तक्रार करणार आणि न्यायालयात जाणार आहे, असेही नारायण राणे म्हणाले. ठाण्यातील घटनेनंतर ब्रेकिंग न्यूज सुरु झाली असे वातावरण निर्माण करण्यात आले. राज्याचे निष्क्रिय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाण्याला गेले आणि तिथे कुणाची तरी प्रसूती करण्यासाठी चाललो आहे असे सांगितले, नवा उद्योग सुरु केला आहे का, खरेच ती महिला गरोदर होती का, तर नाही आणि तिला मारही लागला नव्हता, असे असूनही उद्धव ठाकरे यांनी भाषण केले, त्यांना चांगले कधी बोलता आले नाही. बाळासाहेबांचा मुलगा याच्या शिवाय त्यांचे काय कर्तृत्व आहे, कोणत्या विषयाचे ज्ञान आहे? बाळासाहेबांचा मुलगा आणि शरद पवारांची मेहरबानी आणि हिंदुत्वाचा त्याग करून मुखमंत्री पद मिळाले, असेही नारायण राणे म्हणाले.

(हेही वाचा मोदी, शाह, फडणवीसांवर टीका करता याला माफी नाही भरपाई होणार; नारायण राणेंचा इशारा)

अडीच वर्षे मुख्यमंत्री होतात सगळे खोके मातोश्रीत नेले 

बाळासाहेब असते तर काय म्हणाले असते. माझे शिवसैनिक घरात घुसून मारतील, असे उद्धव ठाकरे म्हणतात. स्वतः कधी कुणाच्या कानफटात मारली आहे का, आता शिवसैनिकांना रस्त्यावर उतारा म्हणतात, अडीच वर्षे मुख्यमंत्री होतात सगळे खोके मातोश्रीत नेले कोरोना काळात कोणत्या शिवसैनिकाला पैसे दिले? त्यावेळी औषधाचे टेंडर निघायचे त्यातील १५ टक्के आदित्यने घेतले. एक नंबरचा खोटारडा, दगाबाज माणूस आहे. रोशनी शिंदे मोदींवर बोलतात, त्या कोण आहेत? त्यांची काय पात्रता आहे, उद्धव ठाकरे उलट तिच्यासाठी ठाण्यात गेले तिला भेटायला. सोबत कुटुंब घेऊन गेले, कारण त्यांना एकटे जाता येत नाही, कुणीतरी सांभाळायला हवे. सभेत त्यांना विशेष खुर्ची दिली कारण ते त्या खुर्ची शिवाय बसू शकत नाही, त्यांचे पाठीचे दुखणे आहे. उद्धव ठाकरे आणि मला एकत्र बसवावे मग बोलू आम्ही कुणाच्यामध्ये हुशारी आहे हे मग ठरवा, असे आव्हानही राणे यांनी दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.