…तर महाराष्ट्र हायकोर्टाला चालवायला द्या, एसटी संपावरून नारायण राणेंचा घाणाघात

78

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप मिटण्याचे संकेत दिसत नाही. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीवर ठाम असून एसची कर्मचारी गेल्या तेरा दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. १३ दिवस उलटून गेल्यानंतरही राज्य सरकारकडून कोणताही तोडगा काढला जात नसल्याचे समोर आले आहे. अशातच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. यासह नारायण राणेंनी एसटीच्या विलिनीकरणावर तसेच कर्मचाऱ्यांच्या मागणीच्या मुद्द्यावर अनिल परब यांच्यावरदेखील निशाणा साधला आहे.

…तर हायकोर्टाला महाराष्ट्र चालवायला द्या

नारायण राणे यांनी एसटीच्या विलिनीकरणावर तसेच कर्मचाऱ्यांच्या मागणीच्या मुद्द्यावर अनिल परब यांना देखील धारेवर धरत निशाणा साधला आहे. यावेळी नारायण राणे म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करू शकत नाहीत, हायकोर्टाची वाट बघत आहात. मग तुम्ही कमी पडला असाल तर हायकोर्टाला महाराष्ट्र चालवायला देऊन टाका. हे प्रश्न तुम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीला मांडा. सर्व निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होतात ना ? आता मुख्यमंत्री नाहीत दुसरे कोणी असतील मग सांगा आणि निर्णय घ्या. अनिल परब कोकणचे वाटत नाहीत तर ते केरळचे वाटतात. त्यांना एसटी कर्मचाऱ्यांबद्दल जराही आत्मीयता वाटत नाही का? ते मुंबईचे उद्धव ठाकरे यांचे कलेक्टर आहेत, असे म्हणत देखील त्यांनी त्यांच्यावर टीका केली.

(हेही वाचा- एसटी संपाचा तिढा कायम! २० डिसेंबरला होणार पुढील सुनावणी)

…राज्य सरकार संपाचा प्रश्न खेळवतंय

एसटीचा विषय महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत येतो. गेले किती दिवस एसटीचा संप सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी जवळपास ४० लोकांनी आत्महत्या केली. त्या सर्वांच्या घरची परिस्थिती भयावह आहे. असे असतानाही राज्य सरकार हा प्रश्न खेळवतंय या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हे सरकार गांभीर्याने घेत नाही. केंद्र सरकारने सरळ महाराष्ट्र सरकारला निर्देश द्यावेत. हा प्रश्न त्वरित मिटववा, अन्यथा राज्यपालांकडे आम्ही हे अधिकार देऊ आदेश केंद्राने द्यावेत. मी स्वतः गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलेन, असं नारायण राणे म्हणाले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.