नारायण राणेंना सिंधुदुर्गात मिळतोय ‘जन आशीर्वाद’!

शनिवार सकाळीच राणे यांनी त्यांच्या बालेकिल्ल्यात यात्रेला सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेते आशिष शेलार हे होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे अटक नाट्य संपल्यानंतर दोन दिवसांनी नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या शेवटच्या टप्प्याला रत्नागिरीतून सुरुवात झाली. शुक्रवारी राणेंचे रत्नागिरीत जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी राणे त्यांचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्गात गेले असता रात्री उशिरा ११ वाजता मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी जमले होते, कोकणात जेथे १० वाजता सामसूम वातावरण असते, त्या कोकणात राणेंच्या स्वागतासाठी रात्री उशिरा शेकडो कार्यकर्ते जमले, यावरून राणेंना सिंधुदुर्गात जन आशीर्वाद मिळत असल्याचे दिसून आले.

रात्री उशिरा शेकडो कार्यकर्ते जमले! 

रत्नागिरीतील यात्रा आटोपून राणे जेव्हा रात्री उशिरा १० वाजता जेव्हा सिंधुदुर्गात पोहचले, तेव्हा त्यांचे ढोल ताशांनी स्वागत करण्यात आले. त्यावेळी रात्री उशिरा शेकडो कार्यकर्ते जमले होते. विशेष म्हणजे इतक्या रात्री कोकणात सामसूम वातावरण असते. इतक्या रात्री घरी परतण्यासाठी कोणतेही माध्यम नसते, त्यामुळे कोकणी माणूस सहसा कुणी इतक्या उशिरा घरा बाहेर नसतो. असे असतानाही शेकडो कार्यकर्ते राणेंच्या स्वागतासाठी कणकवलीत जमले होते, त्यामुळे राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यात खऱ्या अर्थाने जन आशीर्वाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

(हेही वाचा : नारायण राणेंचे आता सिंधुदुर्गात धुमशान!)

कणकवलीत पावलोपावली स्वागत!

शनिवार सकाळीच राणे यांनी त्यांच्या बालेकिल्ल्यात यात्रेला सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेते आशिष शेलार हे होते. जन आशीर्वाद यात्रेच्या कोकण दौऱ्यादरम्यान सिंधुदुर्गातील नांदगाव येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातर्फे मोठ्या उत्साहात राणेंचे स्वागत करण्यात आले. तसेच मुस्लिम समाज, नांदगाव ग्रामपंचायत व महिला बचत गटातर्फे सत्कार स्वीकारत त्यांनी त्यांच्या खात्याची माहिती दिली. त्याआधी राणेंनी सिंधुदुर्गातील जानवली येथे ग्रामस्थांकडून जंगी स्वागत करण्यात आले तसेच लगतच्या मंदिरात हनुमंताचे दर्शन घेऊन नागरिकांचे सत्कार स्वीकारले. कणकवलीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा केला. सकळ मराठा समाजाच्या वतीने त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

राज्य सरकारला फक्त राणे दिसतात! 

चार टकली येतात, झेंडा दाखवतात आणि पाळतात, काय शिवसेनेची अवस्था आहे. मी शुक्रवारी सिंधुदुर्गात आलो तेव्हा शेकडो कार्यकर्ते जमले होते, त्यावेळी सेनेची चारच टाळकी जमली होती. काळ पगार मिळत नाही म्हणी एस ती कामगाराने आत्महत्या केली, आता एसटी कामगार आत्महत्या करू लागले आहेत. कामगारांना पगार मिळत नाही. सगळ्याच क्षेत्रात अशी अवस्था आहे. पण त्यांच्या समस्यांकडे पाहायला या सरकारला वेळ नाही, त्यांना फक्त नारायण राणे दिसतात. राणे कुठे जातात, राणे काय बोलतात, माझ्या मागे काय पीआर लावला आहे का, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here