मोदी सरकारच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तारात ४३ मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यानंतर अवघ्या काही तासातच मोदींच्या मंत्रिमंडळातील जुन्या-नव्या मंत्र्यांना देण्यात आलेल्या खात्यांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये बहुचर्चित असलेले नारायण राणे यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय देण्यात आले आहे. तर, रावसाहेब दानवे यांना आता रेल्वे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.
कपिल पाटील पंचायत राज, तर कराडांना अर्थ राज्यमंत्री
कपिल पाटील यांना पंचायतराज राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मराठवाड्यातील भाजपा नेते डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. याचबरोबर डॉ. भारती पवार यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सर्वाधिक चर्चा होती ती डॉ. हर्ष वर्धन यांनी आरोग्य मंत्री पदाचा राजीनामा दिला त्याची. ऐन कोरोनाच्या साथीमध्ये त्यांनी राजीनामा दिल्याने हे खाते कुणाला देणार याविषयी उत्सुकता होती. हे खाते मनसुख मांडवीय यांच्याकडे देण्यात आले आहे.
PM Modi allocated Ministry of Personnel, Public Grievances & Pensions, Amit Shah – Minister of Home Affairs & Minister of Cooperation, Rajnath Singh allocated Minister of Defence, Nirmala Sitharaman allocated Minister of Finance & Minister of Corporate Affairs: Rashtrapati Bhavan pic.twitter.com/qICSmJGPrl
— ANI (@ANI) July 7, 2021
Allocation of portfolios among the following members of the Council of Ministers. pic.twitter.com/uJA9rfGWgQ
— ANI (@ANI) July 7, 2021
Allocation of portfolios among the following members of the Council of Ministers. pic.twitter.com/uJA9rfGWgQ
— ANI (@ANI) July 7, 2021
(हेही वाचा : मोदी मंत्रिमंडळ – २ विस्तार : आजवरची सर्वात तरुण ब्रिगेड!)
अमित शहांकडे नवीन सहकार विभागाची जबाबदारी!
त्यासोबतच नव्याने तयार करण्यात आलेल्या केंद्रीय सहकार विभागाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. अमित शाह यांच्याकडे सहकार विभागाचा अतिरिक्त भार असणार आहे. अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्री आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री, तर धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री पद देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नारायण राणे यांनी चार व्यक्तींचे प्रामुख्याने आभार मानले, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होता.
Join Our WhatsApp Community