नारायण राणेंचे आता सिंधुदुर्गात धुमशान!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आता त्यांचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्गात पोहचली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोहचण्याधीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमावबंदी लागू केली. मात्र जमावबंदीचा आदेश झुगारून राणेंचे शुक्रवारी रात्री उशिरा कणकवलीत जंगी स्वागत करण्यात आले. त्यामुळे शनिवारपासून २ दिवस राणे त्यांच्या बालेकिल्ल्यात धुमशान घालणार आहे, अस्से चित्र आहे.

रत्नागिरीपासून राणेंचा हल्लाबोल सुरूच

अटक नाट्यानंतर राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या शेवटच्या टप्प्याची सुरुवात शुक्रवारपासून सुरु झाली. आता राणे पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणार का, अशी चर्चा सुरु असताना राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका सुरूच ठेवली आहे. रत्नागिरीत दिवसभर असताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मंत्रालयात न येता मातोश्रीत राहून कारभार करत आहेत, मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्रालयात जात नाहीत, असे वक्तव्य राणे यांनी केले, तसेच भावाच्या पत्नीवर ऍसिड फेकायला कुणी सांगितले होते, मला सगळी प्रकरणे माहीत आहेत. ३९ वर्षे त्यांच्याबरोबर होतो, सगळे टप्प्याटप्याने बाहेर काढीन, माझ्या वाट्याला जाऊ नका, असा प्रकारची वक्तव्ये करून राणेंनी मुख्यमंत्र्यांवरील हल्लाबोल सुरूच ठेवला आहे.

सिंधुदुर्गात राणे काय बोलणार?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आता त्यांचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्गात पोहचली आहे. त्यामुळे राणे अधिक प्रखरतेने बोलतील अशी शक्यता आहे, कारण त्यांनी रत्नागिरीतच त्यांचे संकेत दिले. त्यामुळे आता राणेंच्या सिंधुदुर्गातील जन आशीर्वाद यात्रेकडे लक्ष लागले आहे. दरम्यान प्रशासनाने याआधीच सिंधुदुर्गात संचारबंदी लागू केली आहे. तरीही राणेंचे सिंधुदुर्गात जंगी स्वागत करण्यात आले. तसेच त्यांची मिरवणूक शिवसेना शाखेच्या समोरून जात असतानाच राणे समर्थकांनी मुद्दाम घोषणाबाजी केली. दरम्यान शिवसेनेचे कणकवलीचे आमदार वैभव नाईक यांनी मात्र आम्ही जन आशीर्वाद यात्रेला विरोध करणार नाही, कोकणच्या विकास करावा, असे नाईक यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here