Narayan Rane: जे अभ्यास करीत नाहीत, त्यांना पेपर कठीण जातो, नारायण राणेंनी माध्यमांशी साधला संवाद; म्हणाले…

नारायण राणे तब्बल १ लाखांहून अधिक मतांनी निवडून येणार, असा विश्वास शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

210
Narayan Rane : लोकसभेच्या विजयाचा फायदा पदवीधर निवडणुकीत होईल - नारायण राणे

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी, (७ मे) मतदान पार पडत आहे. महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा सामना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्याशी होत आहे. नारायण राणेंनी या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद लावून दिली आहे.

दरम्यान, नारायण राणे यांनी त्यांच्या वरवडे या गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा. मी देवाला नमस्कार करून मतदानासाठी आलो आहे. मला यश प्राप्त करून द्यावे, अशी देवाजवळ प्रार्थना”

(हेही वाचा – Helicopters in Election Campaigns : निवडणूक प्रचारासाठी हेलिकॉप्टरवर राजकीय पक्ष किती पैसे खर्च करतात माहीत आहे?)

“मी नेहमीच पेपरला बसतो, त्यावेळी अभ्यास करून बसतो. मी हुशार विद्यार्थी आहे. जे अभ्यास करीत नाहीत, त्यांना पेपर कठीण जातो. मी माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्गातील मतदार बंधू भगिनी आणि वडीलधारी मंडळींना विनंती करेन की, लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे”.

“मोदींनी घोषणा केली आहे की, अब की बार ४०० पार. आमचे ४०० खासदार निवडून येणार. त्यामध्ये आपल्या कोकणचा, हक्काचा आणि तुम्ही अनेक वर्षे प्रेम दिले, त्याप्रमाणे याही वेळेला लोकसभेच्या निवडणुकीसाठी या सर्वांनी मतदान करावे”, अशी विनंती नारायण राणे यांनी केली.

दीपक केसरकरांचा विश्वास
दरम्यान, नारायण राणे तब्बल १ लाखांहून अधिक मतांनी निवडून येणार, असा विश्वास शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. सावंतवाडी मतदारसंघातून राणेंना ७० हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी सहकुटुंब सावंतवाडी चितारआळी येथील मतदान केंद्रावर केसरकर कुटुंबियांनी मतदान केले. यानंतर दीपक केसरकर यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले की, नारायण राणे यांचा मोठा मताधिक्यांनी विजय होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.