नारायण राणेंच्या अडचणीत वाढ होणार! CRZ प्रकरणी नोटीस

125

जुहूतील अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरणात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने नारायण राणेंच्या जुहूतील बंगल्याला नोटीस बजावली होती. दरम्यान, पालिकेनंतर आता मुंबई उपनगर जिल्ह्याधिकारी कार्यालयानेही नोटीस बजावली आहे. सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) चे उल्लंघन प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

(हेही वाचा – दोन दिवस पडणार ताऱ्यांचा पाऊस, दर तासाला पडणार १००० उल्कापिंड!)

मिळालेल्या माहितीनुसार, 10 जून रोजी सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचा आदेशही राणे यांना देण्यात आला आहे. त्यामुळे राणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुहू येथील अधिश बंगल्याच्या सीआरझेडचे उल्लंघन केल्याप्रकरणी नारायण राणेंना पाठवण्यात आलेली नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये राणे यांना 10 जूनला यावरील सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. 2007 मध्ये पर्यावरण मंत्रालयाने सीआरझे़ड अंतर्गत ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. मात्र, त्यातील दोन अटींचे उल्लंघन नारायण राणेंकडून करण्यात आले आहे.

सुनावणीला उपस्थित न राहिल्यास…

पर्यावरण मंत्रालयाने 2007 मध्ये सीआरझेड अंतर्गत एनओसी दिली होती. त्यातील 2 अटींचे उल्लंघन नारायण राणे यांनी केल्याचा आरोप केला आहे. नियमानुसार, 1 एफएसआय होता त्याऐवजी 2.12 एफएसआय वापरला गेला. तसेच 2810 चौरस मीटर बांधकाम परवानगी होती. त्याऐवजी 4272 चौरस मीटर बांधकाम केले आहे म्हणजेच 1461 चौरस मीटर बांधकाम जास्तीचे करण्यात आले. सीआरझेडप्रकरणी उल्लंघन झाल्याबाबत सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाकडे तक्रार आली आहे. त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हा किनारा क्षेत्र व्यवस्थापन कमिटीने पालिकेच्या अहवालाच्या आधारे राणेंना नोटीस बजावली आहे. या सुनावणीला उपस्थित न राहिल्यास या विषयावर तुमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, असे समजून पुढील कारवाई करणार असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.