दिशा सालीयनवर बलात्कार करून हत्या – नारायण राणे

सुशांत सिंह राजपूत याची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा  खळबळजनक आरोप माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी केला असून, या पार्टीला ठाकरे सरकारमधील एक युवा मंत्री देखील असल्याचे नारायण राणे यांनी यावेळी म्हटले आहे. भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे दिशा सालीयन हिला भगवती रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आले पण तिच्या पोस्ट मोर्टम रिपोर्टमध्ये तिच्या गुप्तांगावर जखमा आढळून आल्याचे नारायण राणे म्हणालेत.

भाजपा नेते, माजी मुख्यमंत्री तथा खासदार मा. श्री. नारायणराव राणे साहेब यांची पत्रकार परिषदभाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय येथून Live

Posted by Nitesh Rane on Tuesday, August 4, 2020

दिनो मोरियाच्या घरी मंत्री काय करतात?

सुशांतच्या घराजवळ एक बंगला आहे. तिथे रोज काही मंत्री येतात. ते तिथे तीन तास काय करतात? असा सवाल देखील राणेंनी यावेळी उपस्थित केला. 13 तारखेला मंत्री तिथे जमले आणि तिथून सुशांतच्या घरी गेले. तिथे मंत्री गेले असतील तर कॅमेऱ्यात त्यांचा ताफा वगैरे येणार नाही. पण सर्वाना माहिती आहे तो मंत्री कोण आहे तो तसेच याचमुळे सरकार आणि पोलिसांवर दबाव येत आहे असे राणे म्हणालेत.

या सरकारला लायसन्स दिलेले नाही 

रिया चक्रवर्ती ही सुशांतची मैत्रिण, त्याच्यासोबत राहायची. ती 9 तारखेला त्याला सोडून गेली. या प्रकरणातील प्रमुख व्यक्ती तीन-चार दिवसांपासून गायब झाली आहे. पोलिसांना याबाबत माहिती नाही. मुंबई पोलीस अज्ञात असतील, असं मला वाटत नाही. मंत्री असो किंवा कुणीही असो, निरपराध मुलींवर अत्याचार करुन त्यांचा खून करण्याचं या सरकारला लायसन्स दिलेलं नाही. रिया चक्रवर्तीला शोधून तिच्याकडून अधिकची माहिती घेणं आवश्यक आहे. सुशांतच्या केसमध्ये जे लोक वाचवायचा प्रयत्न करत आहेत त्यांनी गप्प बसावं. नाहीतर त्यांच्याही कुंडल्या बाहेर काढल्या जातील, असे नारायणा राणेंनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here