शिवसेना पक्षप्रमुख हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पूत्र एका सभेत म्हणतो की, सोसायटीमध्ये तुम्हाला जर बकरी ईदला परवानगी द्यायची नसेल, तर दिवाळीचा कंदील उतरवा. त्यावेळी मला हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आठवले. त्यावेळी त्यांचा हा पूत्र असे बोलला असता तर त्याला बाळासाहेबांनी त्याला गोळ्या घातल्या असत्या, अशी टीका भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. दि. ८ नोव्हेंबरला कुडाळमध्ये झालेल्या निलेश राणेंच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
( हेही वाचा : राहुल गांधी खोटे बोलणारी फॅक्टरी; Amit Shah यांचा हल्लाबोल)
पुढे नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले की, काही लोकांबद्दल न बोलणेचं बरे. त्यांची भाषा संस्कृत तर नाहीच पण राजकारणाला किंवा बाळासाहेबांना शोभेल अशीही नाही. ते काहीही बरळतात, शिव्यासुद्धा देतात. याआधी हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे असताना एखादा कार्यकर्ता नावारुपाला येतोय, असं कळल्यावर उद्धव ठाकरे त्याला कमजोर करण्याचे काम करतात. त्यामुळे अशामुळे उद्धव ठाकरेंचे २५ उमेदवारही निवडून येणार नाहीत, असा दावा राणे (Narayan Rane) यांनी केला आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community