राज्य सरकारने मराठा समाजाला फसविल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहे.तर यापूर्वी छगन भुजबळां पाठोपाठ आता नारायण राणे (Narayan rane) यांनी या आरक्षणाच्या मसुद्याला विरोध दर्शविला आहे. दरम्यान राणे यांनी ऑक्टोबर मध्ये मराठा समाजाला कुणबींचे आरक्षण देण्यास विरोध केला होता. त्यांनी ‘x’ वर याबाबत विरोध दर्शविला आहे. तसेच याबाबत आपण सोमवारी पत्रकार परिषद घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Maratha Reservation)
लाखोंच्या संख्येने मराठा आरक्षण आंदोलक मुंबईच्या वेशीवर आलेले असताना राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या तेराही मागण्या मान्य केल्या आहेत. यामध्ये आंदोलकांवरील गुन्हे, सगेसोयऱ्यांना आरक्षणअसे मुद्दे आहेत. राज्य सरकारला एखाद्या जातीला आरक्षण द्यायचे असेल तर त्यासाठीच्या घटनात्मक तरतुदी काय आहेत याचाही जरांगे यांनी अभ्यास करावा. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही. कुणबी घेण्याला काही वाईट नाही, कुणबी म्हणजे शेती, आमचा बाप शेती करतो मग तो श्रीमंत मराठा असला तरीही शेती करतो. (Maratha Reservation)
मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. उद्या सोमवार दि. 29 जानेवारी रोजी मी…
— Narayan Rane (@MeNarayanRane) January 28, 2024
(हेही वाचा : Raj Thackeray: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करा – राज ठाकरे)
जे जमिनीवर राहणार नाहीत, मायभूमीत राहणार नाहीत त्यांनी आरक्षण घेऊ नये, असे जरांगे म्हणाले होते. यानंतर राणेंनी फारवेळा मराठा आरक्षणावर आपली प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र राणे यांनी मराठा आरक्षणाच्या मसुद्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. ९६ कुळी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र नको आहे. मी देखील मराठा आहे आणि मला कुणबी प्रमाणपत्र नको आहे. जरांगे म्हणतात तसे मराठा आणि कुणबी एकच आहेत असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असे राणे म्हणाले होते. यावरून जरांगे यांनी राणेंना प्रत्यूत्तर दिले होते.राज्यातील कानाकोपऱ्यातील मराठा समाज आरक्षण मागत आहेत. सोमवार २९ जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन, असे राणे म्हणाले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community