-
प्रतिनिधी
दिशा सालियन प्रकरणावरून विधानसभेत आणि विधानपरिषदेत मोठा गदारोळ झाल्यानंतर भाजपा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी भाजपा आमदार चित्रा वाघ यांचे जाहीर कौतुक केले आहे. “वा! चित्राताई वाघ व्वा… बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी तुमचा गौरव केला असता,” अशा शब्दांत नारायण राणे (Narayan Rane) यांनी वाघ यांच्या भूमिकेचे समर्थन करत स्तुती केली.
दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावर विधानसभेत आणि विधान परिषदेत चर्चेवेळी चित्रा वाघ यांनी ठाम भूमिका घेतली होती. दिशा सालियनच्या वडिलांनी या प्रकरणी याचिका दाखल केली असून, राज्य सरकारने यासाठी एसआयटी नेमली आहे. या प्रकरणाचा अहवाल सर्वांसमोर यायला हवा, दूध का दूध आणि पानी का पानी व्हायला हवं, अशी मागणी वाघ यांनी विधानपरिषदेत केली होती. यावेळी शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. त्यानंतर नारायण राणे (Narayan Rane) यांनी ट्विटरवरून चित्रा वाघ यांची पाठराखण केली आणि त्यांचे खुले कौतुक केले.
वा! चित्राताई वाघ वा!@ChitraKWagh pic.twitter.com/J7SI6EhE1P
— Narayan Rane (@MeNarayanRane) March 21, 2025
(हेही वाचा – Sanatan Sanstha : गोव्यात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ मध्ये किमान 20 हजारांची असणार उपस्थिती)
राणे (Narayan Rane) आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, “वा! चित्राताई वाघ वा! छत्रपती शिवरायांच्या १५ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात एका निरपराध मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्यांना आपण चव्हाट्यावर आणले. आपल्याला विरोध करणाऱ्यांचीही तुम्ही चिंधड्या उडवल्या. तुमच्यासारख्या लढवय्या वाघिणींची महाराष्ट्राला गरज आहे. आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी तुमचा गौरवच केला असता. लगे रहो चित्राताई!”
राणेंच्या (Narayan Rane) या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. चित्रा वाघ यांनी आपली भूमिका ठामपणे मांडल्याबद्दल भाजपामध्येही त्यांचे जोरदार कौतुक होत आहे. दिशा सालियन प्रकरणाचा तपास आणि त्यावरून सुरु असलेली राजकीय खडाजंगी अजून किती तापते, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community