Narayan Rane: “… मग परत जायचा रस्ता कुठून जातो ते मी दाखवतो”, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

218
Narayan Rane:
Narayan Rane: "... मग परत जायचा रस्ता कुठून जातो ते मी दाखवतो", नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणाऱ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी खुलं आव्हान दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टिकेवरून बोलताना नाराय राणे यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. राणे (Narayan Rane) म्हणाले, “सिंधुदुर्ग दौऱ्यात असे शब्द बोलून दाखव, मग परत जायचा रस्ता कुठून जातो ते मी तुला दाखवतो. आमच्या नेत्यांवर टीका चालणार नाही.” असे म्हणत नारायण राणेंनी (Narayan Rane) हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्राला काय दिलं? कोकणाला काय दिलं?

राणे (Narayan Rane) म्हणाले, “अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात गेला. या कोकणाला त्यांनी काहीच दिलं नाही. कोणतीही योजना दिली नाही. काय कामाचा असा मुख्यमंत्री? महाराष्ट्राला काय दिलं? कोकणाला काय दिलं?” असा सवाल करत नारायण राणेंनी (Narayan Rane) उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. (Narayan Rane)

आमच्या नेत्यांनी तुमच्यासारखं सगळं सोडलेलं नाही

“आमचे नेते नरेंद्र मोदी असो, अमित शहा असो किंवा देवेंद्र फडणवीस असो आमच्या नेत्यांनी तुमच्यासारखं सगळं सोडलेलं नाही.” असं ही राणे (Narayan Rane) म्हणालेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपने नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर खासदार विनायक राऊत निवडणुकीसाठी उभे आहेत. विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी २०१४ आणि २०१९च्या निवडणुकीत नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांचा पराभव केला होता. (Narayan Rane)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.