‘…तर घर गाठणे कठीण होईल’, पवारांच्या धमकीला आता राणेंचं उत्तर

एकनाथ शिंदे यांच्या बंडात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील उडी घेतली आहे. बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात यावंच लागेल, आपल्या बंडाचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असे विधान शरद पवार यांनी केले. त्यांच्या या विधानाला आता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उत्तर दिले आहे. बंडखोर आमदारांच्या केसाला जरी धक्का लागला तर घर गाठणे कठीण होईल, असा स्पष्ट इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. नारायण राणे यांनी ट्वीट करत हे आव्हान केले आहे.

नारायण राणे यांचे ट्वीट

शरद पवार हे सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, असे ते म्हणत आहेत. ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल, असे ट्वीट करत नारायण राणे यांनी शरद पवार यांच्या विधानाला उत्तर दिले आहे.

(हेही वाचाः पुतण्याचे बोलणे काकांनी खोडले, काय म्हणाले शरद पवार?)

तसेच आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही, अशा शब्दांतही नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

(हेही वाचाः एकनाथ शिंदेंच्या पाठीशी कोण? शरद पवारांचा रोख कुणाकडे)

शरद पवार यांचे विधान

शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावंच लागेल. बंडखोर आमदारांनी घेतलेला निर्णय हा पक्षांतर बंदी कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दांत शरद पवार यांनी पत्रकारल परिषद घेत बंडखोर आमदारांना इशारा दिला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here