राजकारणात प्रोटोकॉल असतो हे माहीत आहे, पण निमंत्रण पत्रिकेवर माझेच नाव बारीक अक्षरात लिहिले. हा यांचा संकुचितपणा आहे. चिपी विमानतळाची कार्यक्रम पत्रिका छापली आहे. त्यात माझे नाव बारीक अक्षरात छापले आहे. त्यावर शाईही फाटली आहे. शिवाय माझे नावही तिसऱ्या क्रमांकावर टाकले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंपेक्षा राजकारणात आणि प्रोटोकॉलमध्येही मीच सीनियर आहे. पण ठिक आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांना पहिला मान दिला, त्यावर काही हरकत नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री कोण आहे हे महत्त्वाचे नाही. माझे नाव बारीक का झाले हे माहीत नाही. ही एक संकुचितवृत्ती आहे, असे केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे म्हणाले.
तेव्हा विमानतळाला मान्यता मिळाली
मी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करायला सांगितले. आम्ही त्यावेळी सर्व हॉटेल्स, मालकांना बोलावले, युरोपचा माणूस आला तर काय जेवण द्यायचे याचे आम्ही मार्गदर्शन केले. मी त्यावेळी रस्ते करायला घेतले. 1999 साली मी मुख्यमंत्री झालो, मला त्यावेळी साथदार चांगले मिळाले. 110 कोटी घेऊन मी रस्ते आणि पुलांचे काम केले. धरणे आणि कालवे बांधले. परदेशी पर्यटक आला तर सात दिवस रहावा, त्याने सात दिवसात पाच लाख खर्च करावे हा आमचा हेतू आहे. म्हणून आम्ही विमानतळाची ती साईट निवडली. मी प्रफुल्ल पटेल यांना मंत्री असताना फोन केला आणि मला जिल्ह्यात विमानतळ हवे, असे सांगितले. प्रफुल्ल पटेल यांनी मला त्यांच्या जिल्ह्यातील काम करून द्या, असे सांगितले. या तडजोडीवर विमानतळाला परवानगी मिळाली, असे राणे म्हणाले.
(हेही वाचा : पाहुण्यांची आम्हाला चिंता नाही… आयकर विभागाच्या कारवाईनंतर पवारांचा हल्लाबोल)
चिपी विमानतळाचा कार्यक्रम देसाईंच्या घरचा नाही!
विमानतळ हे पर्यटकांसाठी आहे. पर्यटकांनी भरपूर पैसा खर्च करावा, आम्ही विमानतळ केले हे मान्य करा, माझं आणि त्यांचे तसे काही वैर नाही, काही न करता काहीजण मिरवत आहेत. काहीची लायकी नाही, उद्या आम्ही त्यांचा पाहुणचार करू. आमच्या जिल्ह्यात कुणी येऊन वाईट करू शकत नाही. शिवसेनेला विमानतळाचे श्रेय घेता येणार नाही. हा कार्यक्रम देसाई यांच्या घरचा नाही राज्य सरकारचा आहे. त्यांनी विरोधीपक्ष नेत्यांना बोलवायला हवे होते. देवेंद्र फडणवीस सहनशील नेते आहेत. मी असतो तर यांना दाखवले असते. उद्याचा बंद एक दिवसाचा असेल. दुःखात अजून एक सेलिब्रेशन आहे, असे राणे म्हणाले.
Join Our WhatsApp Community