Maratha Reservation : मनोज जरांगे लहान, त्यांना अजून अभ्यास करण्याची गरज – नारायण राणे

आरक्षण कसं मिळतं, भारतीय राज्यघटनेत आरक्षणाबाबत काय तरतुदी आहेत, हे जरांगे पाटलांनी जाणून घ्यावं. ओबीसीतून आरक्षण हवं की नको, हे त्यांनी मराठा समाजाला विचारावं.

118
Maratha Reservation : मनोज जरांगे लहान, त्यांना अजून अभ्यास करण्याची गरज - नारायण राणे
Maratha Reservation : मनोज जरांगे लहान, त्यांना अजून अभ्यास करण्याची गरज - नारायण राणे

मराठा समाजातील अनेकजण गरीब आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण हे मिळाले पाहिजेच. परंतु, ओबीसी समाजाच्या वाट्याचं आरक्षण काढून ते मराठ्यांना देऊ नये, या मताचा मी आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. कुठल्याही राजकीय नेत्याने मराठा आणि ओबीसी अशी झुंज लावू नये. माझ्या काळात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आले होते. पण ते ओबीसींचं काढून दिले नव्हते, मनोज जरांगे अजून लहान आहेत. त्यांनी आणखी अभ्यास करावा,असेही नारायण राणे गुरुवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (Maratha Reservation)

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर टीका करताना नारायण राणे म्हणाले की, “आरक्षण कसं मिळतं, भारतीय राज्यघटनेत आरक्षणाबाबत काय तरतुदी आहेत, हे जरांगे पाटलांनी जाणून घ्यावं. ओबीसीतून आरक्षण हवं की नको, हे त्यांनी मराठा समाजाला विचारावं. कोणताही मराठा ओबीसीतून आरक्षण घेणार नाही असेही ते म्हणाले. (Maratha Reservation)

उद्धव ठाकरेंवर टीका
“उद्धव ठाकरे गट आहे का? गट म्हणावा इतके तरी नेते आहेत का त्यांच्याकडे? तसंच तो नुसता आहेत त्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जायला सांगेल, पैसे देणार नाही. मातोश्रीमध्ये फक्त वनवे आहे तिथे पैशांची आवक होते, पैसे बाहेर जात नाहीत. मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो मला सगळं माहीत आहे.” असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

(हेही वाचा :Aarey Forest : आरे मधून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना ग्रीन टोल लागणार?)

तर प्रकाश आंबेडकरांना अटक केली पाहिजे
प्रकाश आंबेडकर जर दंगलीची माहिती लपवत असतील तर त्यांच्यावर एफआयआर दाखल करुन त्यांना अटक केली पाहिजे. कारण कुठल्या कालावधीत कुठल्या ठिकाणी दंगल होणार हे माहीत असेल तर त्याचा पुरावा द्यावा लागतो. ते म्हणाले असं चालत नसतं. प्रकाश आंबेडकरच नाही तर इतर कुणीही असं वक्तव्य केलं तर त्याची दखल पोलिसांनी घेतली पाहिजे. प्रकाश आंबेडकर यांच्याविषयीच मी बोलतो आहे असं नाही. ज्यांना दंगल होणार याची माहिती आहे आणि ते तसं वक्तव्य करत आहेत त्यांच्याविषयी बोलतो आहे असंही नारायण राणे म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.