Narayan Rane : दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधारी भाजपाने शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना चांगलचं घेरले आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) सातत्याने या प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधतांना दिसत आहे. तर याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मोठी मागणी केली जात आहे. अशातच शनिवार, २२ मार्च रोजी भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांचे आपल्याला दोन फोन आल्याचा दावा राणे यांनी केला आहे. (Narayan Rane)
(हेही वाचा – Child Mortality: बालमृत्यूंबाबत सरकारी पोर्टलवर माहितीची लपवाछपवी; एप्रिल २०२४ नंतरची माहितीच उपलब्ध नाही)
नारायण राणे काय म्हणाले ?
त्यावेळी ही घटना घडली तेव्हा मी मुंबईवरून घरी चाललो होतो, तेवढ्यात वांद्रे क्रॉस केल्यावर फोन आला. मिलिंद नार्वेकरचा फोन होता. म्हणाले, दादा साहेबांना तुमच्याशी बोलायचं आहे. मी म्हटलं, कोण साहेब. म्हणाले, उद्धवजी, त्यांच्याबरोबर मी आहे. ते गाडी चालवत आहेत. त्यांना बोलायचं आहे. मी म्हटलं, द्या. त्यांनी फोन घेतल्यावर मी म्हटलं जय महाराष्ट्र साहेब, बोला, ते म्हणाले, तुम्ही अजून जय महाराष्ट्र बोलता. मी म्हटलं, मरेपर्यंत बोलणार. हे माझं उत्तर लगेच. तुम्हाला माहीत आहे मी थांबत नाही.
(हेही वाचा – NTPC Green Energy Share Price : एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअरमध्ये मार्च महिन्यात तेजी का दिसून आली?)
पुढे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, नाही साहेब मला हे बोलायचंय तुम्हाला मुलं आहेत. मलाही मुलं आहेत. सध्या तुम्ही जे काही प्रेसला बोलता. आदित्यचं नाव घेता. माझी विनंती आहे की तुम्ही त्याचा उल्लेख करू नये. असं वाटतं म्हणून विनंती करायला फोन केला. मी म्हटलं, उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा. एक तर मी अमूक ठिकाणी, अमूक याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाही. निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे म्हणतोय. आरोपींना अटक झाली पाहिजे हे म्हणतोय. त्यात तडजोड नाही. फक्त तुम्ही तुमच्या मुलाचं नाव घेतलं, त्याला संध्याकाळी जिथे जातो, तिथं जाण्यापासून सांभाळा. सांगा त्याला हे बरं नाही. माझ्या घराच्या समोर तो डिनो मोरिया राहतो. तिथे हे लोक जमतात आणि काय साडे तीन चार तास धुमाकूळ घालतात. मला माहीत नाही. मला माहीत आहे, पण तुम्हाला सांगणार नाही. म्हणून मी सांगितलं तुम्ही त्यांना सांभाळा. उद्धव ठाकरे म्हणाले, साहेब मी पाहतो, सांगतो. पण तुम्ही तेवढं सहकार्य करा. मी म्हणालो, ठिक आहे. अन् त्यांनी फोन ठेवला, असं राणे यांनी म्हटलं आहे.
(हेही वाचा – MVA मध्ये शिवसेना उबाठा एकाकी!)
दुसरा फोन कोविड काळात
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, दुसरा फोन हा कोविड असताना आला. त्यावेळी माझ्या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. माझी राज्य सरकारकडे एक परवानगी बाकी होती. तेव्हा त्यांचा फोन आला. तुम्ही फोन केला होता. मी म्हटलो हो. कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता. उद्धव म्हणाले, साहेब ते तर मिळेलच. पण तुम्हाला सांगतो जरा तुम्ही, प्रेस घेताना तो उल्लेख टाळाल तर बरं होईल. मी म्हटलं परत एकदा सांगतो, तुम्ही म्हणता तसा मी उल्लेख केला नाही. पण एक मंत्री होता असं मी म्हणतोय. हे दोन फोन त्यांनी केले, असं राणे यांनी म्हटलं आहे.
(हेही वाचा – Fraud : अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या सत्य प्रतिज्ञापत्रावर बनावट स्वाक्षरी; गुन्हा दाखल)
दिशाच्या कुटुंबीयांवर दबाव होता
दिशा सालियनच्या कथित आत्महत्येनंतर आम्ही त्यांच्या कुटुंबीयांवर कोणताही दबाव टाकला नाही. ते अगोदरच दुःखात होते. पण ठाकरे गटाचे नेते त्यांच्यावर दबाव टाकत होते. पेडणेकर स्वतः त्यांच्या घरी जात होत्या. त्यामु्ळे त्यांना त्यांच्या हो मध्ये हो मिसळावे लागत होते. त्यावेळी पोलिस यंत्रणाही पीडित कुटुंबीयांना मदत करत नव्हती. या प्रकरणात जे काही प्रकार झाले, ते प्रकरण दडपण्यासाठीच झाले. म्हणूनच आता दबाव कमी झाल्यानंतर तिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली. ते सरकारकडे नव्हे तर कोर्टात गेले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community