शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसचे Congress काही आमदार आमच्यात सामील होतील आणि आमचे सर्वपक्षीय सरकार स्थापन होईल, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, इंडिया आघाडीत 30 पक्ष एकत्र आले, तरीही आम्हाला काही फरक पडत नाही. त्यामुळे काँग्रेस Congress आणि शरद पवार एकत्र आले तर काय फरक पडणार आहे? ते तिघे होते, तरीही ते काही करू शकले नाहीत. तिघांचे दोघे झाले, तरीही काही करू शकले नाहीत. आता दोघांचे पुन्हा तीन झाले आहेत, पुढे चार होतील. पण त्यामुळे काहीही होणार नाही. आता काँग्रेसचेही काहीजण आमच्याकडे येतील, आम्ही सर्व पक्षाचे सरकार स्थापन करत आहोत.
(हेही वाचा CM Eknath Shinde : सत्ता गेल्यामुळे विरोधकांना वेड लागलेय; उद्धव गटाच्या टीकेवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार)
शरद पवार कृषीमंत्री होणार की नाही हे मी नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघेच सांगू शकतील, असे महत्त्वपू्र्ण विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी केले. त्यांच्या या विधानामुळे शरद पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे.
गत काही दिवसांपासून राज्यात शरद पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी यासंदर्भात एक सूचक विधान केल्यामुळे या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. त्याचे झाले असे की, पत्रकारांनी नारायण राणे यांना शरद पवार केंद्रात कृषीमंत्री होणार का? असा थेट प्रश्न विचारला. त्यावर राणे एक क्षण थांबले अन् म्हणाले, हा माझा विषय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघेच यावर बोलतील.
Join Our WhatsApp Community