Narendra Modi 3.0 : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, महाराष्ट्रातील मंत्र्यांकडे कोणकोणती खाती?

नितीन गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची हॅटट्रिक केली आहे.

315
Narendra Modi 3.0 : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, महाराष्ट्रातील मंत्र्यांकडे कोणकोणती खाती?

लोकसभा निवडणुकीत एनडीएने २९३ जागा जिंकत तिसऱ्यांदा बहुमत मिळवले. त्यानंतर रविवारी, (९ जून) नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले असून, सोमवारी (१० जून) केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप करण्यात आले. (Narendra Modi 3.0) राष्ट्रपती भवनाच्या सचिवालयाने जाहीर केलेल्या यादीनुसार महत्त्वाचे सर्व मंत्रालय भाजपाने आपल्याकडे कायम ठेवले आहेत. महत्त्वाच्या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गृह, संरक्षण, अर्थ आणि परराष्ट्र मंत्रालय कायम राखले आहेत. (Narendra Modi 3.0) महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाले, तर मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममध्ये महाराष्ट्राला कमी खाते मिळाले आहेत. याआधी ९ खाते महाराष्ट्राच्या वाट्याला आले होते. आता फक्त ६ खाते मिळाले आहेत. २ कॅबिनेट, १ राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि ३ राज्यमंत्री पद मिळाले आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे कृषी आणि ग्रामविकास, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे आरोग्य आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे ऊर्जा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

रामदास अठावले यांना सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयत राज्य मंत्रीबनविण्यात आले आहे. रक्षा निखिल खडसे यांना क्रीडा मंत्रालय आणि मुरलीधर मोहोळ यांना सहकारिता मंत्रालयत राज्य मंत्री बनविण्यात आले आहे. याशिवाय मोहोळ यांना नागरिक उड्डयन मंत्रालयचे राज्य मंत्री बनविण्यात आले आहे.

चिराग पासवान यांना क्रीडा मंत्रालयासह अन्न प्रक्रिया उद्योग खाते देण्यात आले आहे. सी आर पाटील यांना जलशक्ती मंत्रालय, गजेंद्र शेखावत यांना सांस्कृतिक-पर्यटन मंत्रालय आणि चिराग पासवान यांना क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय मिळाले आहे. यासोबतच त्यांच्याकडे अन्न आणि प्रक्रिया मंत्रालयाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.

सर्बानंद सोनोवाल यांच्याकडे बंदरे आणि जहाज बांधणीची, राममोहन नायडू यांच्याकडे नागरी विमान वाहतूक, किरेन रिजिजू यांना संसदीय कामकाज आणि भूपेंद्र यादव यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणुकीत पराभूत होऊनही मंत्री करण्यात आलेले रवनीत सिंह बिट्टू यांना अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय देण्यात आले आहे.

भाजपचे विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची तर धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी आहे. जितन राम मांझी यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी आली आहे.

गृह, संरक्षण, वित्त, वाहतूक आणि परराष्ट्र व्यवहार या पाच मोठ्या मंत्रालयांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेले मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कृषी आणि पंचायत राज मंत्रालय मिळाले आहे. अश्विनी वैष्णव यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय देण्यात आले आहे.

नितीन गडकरी रस्ते वाहतूक मंत्री म्हणून कायम राहतील, तर धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री म्हणून कायम राहतील. किरेन रिजीजू यांची पृथ्वी विज्ञान मंत्रालयातून संसदीय कामकाज मंत्रालयात बदली करण्यात आली आहे, तर अर्जुन राम मेघवाल हे कायदा मंत्री म्हणून कायम राहतील. निवेदनात म्हटले आहे की, सर्बानंद सोनोवाल यांनी नौवहन विभाग कायम ठेवला आहे. मोदी आणि ७१ मंत्र्यांनी रविवारी राष्ट्रपती भवनात एका समारंभात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

गडकरींची हॅटट्रिक…
नितीन गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची हॅटट्रिक केली आहे. गडकरी यावेळी नागपूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत, तर पियुष गोयल उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य पियुष गोयल यांना मिळाले होते. दरम्यान, आता त्यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपद खेचून आणले आहे.

मंत्रिमंडळात ७ महिलांना स्थान 
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी, (९ जून) रोजी सायंकाळी ७.१५ वाजता आयोजित समारंभात पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या ७१ सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली होती. सलग तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात ७ महिला मंत्र्यांना स्थान मिळाले आहे. माजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर पंतप्रधानांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. सीतारामन यांच्याशिवाय माजी राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, उत्तर प्रदेशमधून निवडून आलेल्या अनुप्रिया पटेल आणि कर्नाटकमधून निवडून आलेल्या शोभा करंदलाजे यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. पहिल्यांदाच मंत्री झालेल्या महिला नेत्यांमध्ये ३७ वर्षीय रक्षा निखिल खडसे यांच्या नावाचाही समावेश आहे.


मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला कोणतं मंत्रालय?
अमित शाह – गृहमंत्रालय
राजनाथ सिंह – संरक्षण मंत्रालय
एस जयशंकर – परराष्ट्र
नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक
निर्मला सीतारमन – अर्थमंत्रालय
शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय
जतीन राम – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
पियुष गोयल -वाणिज्य
अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्रालय
भूपेंदर यादव – पर्यावरण
राम मोहन नायडू – नागरी उड्डाण मंत्रालय
जेपी नड्डा – आरोग्य मंत्रालय
सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग मंत्रालय
सी आर पाटील – जलशक्ती
किरण रिजीजू – संसदीय कार्यमंत्री
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री

राज्यमंत्री
श्रीपाद नाईक- गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री
शोभा करंदाजे – राज्यमंत्री – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
शांतनु ठाकुर – पोर्ट शिपिंग मंत्रालय, राज्यमंत्री

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.