Devendra Fadnavis यांचे भाजपा कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र, म्हणाले…

204
Devendra Fadnavis यांचे भाजपा कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र, म्हणाले...

देशाच्या पंतप्रधान पदावर पुन्हा नरेंद्र मोदी विराजमान होणार असून लोकसभा निवडणुकीत मतदान केलेल्या मतदारांचे आभार, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीचा पाचवा आणि राज्यातील शेवटचा टप्पा सोमवारी पार पडल्यानंतर फडणवीस यांनी मतदार आणि भाजपा कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. (Devendra Fadnavis)

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांनी लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवात, निवडणूक प्रक्रियेत अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मतदारांच्या मनामनात मोदी होते. त्यामुळे त्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे भाजपाला साथ दिली. मी महाराष्ट्रातील सर्व मतदारांचा अतिशय मनापासून आभारी आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. (Devendra Fadnavis)

१६ मार्च २०२४ या दिवशी निवडणुका जाहीर झाल्या आणि तेव्हापासून आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले. भाजपामध्ये आपण कायमच निवडणुकीसाठी सज्ज असतो. संघटनात्मक कार्य ही आपली सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे नव्याने तयारी करावी लागत नाही. पण तरीही १६ मार्चपासून आपला प्रत्येक कार्यकर्ता नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अहोरात्र झटला. राज्यातील पाचही टप्प्यांत प्रचंड परिश्रम करणाऱ्या तुम्हा सर्वांना मी सलाम करतो, तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, अशा शब्दात फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. (Devendra Fadnavis)

(हेही वाचा – पासपोर्ट जप्त करा, उद्धव ठाकरे ४ जूननंतर लंडनला जाणार; Nitesh Rane असे का म्हणाले?)

एकनाथ शिंदे आणि अजित पवार, राज ठाकरेंचेही आभार

महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जाताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भक्कम साथ दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरेही महायुतीच्या बाजूने उभे राहिले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले, रासपचे महादेव जानकर, रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत, पीआरपीचे जोगेंद्र कवाडे, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आणि इतर सहयोगी पक्षांनी सुद्धा परिश्रम घेतले. या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे. (Devendra Fadnavis)

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणूक प्रचार मोहिमेचे यशस्वी संचलन झाले. आमचे प्रभारी दिनेश शर्मा, सहप्रभारी निर्मलकुमार सुराना, जयभानसिंग पवैय्या यांचे मार्गदर्शन संपूर्ण निवडणूक प्रचार प्रक्रियेतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना लाभले. मी त्यांचाही मनःपूर्वक आभारी आहे. आपल्या सर्वांच्या परिश्रमाने आपण महाराष्ट्रात चांगले यश संपादन करु आणि निश्चितच ४ जूननंतर आपले लाडके नेते नरेंद्र मोदी हे पुन्हा भारतमातेच्या सेवेसाठी प्रधानसेवक म्हणून जबाबदारी स्वीकारतील यात शंका नाही, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात व्यक्त केला आहे. (Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.