Narendra Modi : काँग्रेस देशात आरक्षणाची लूट करू पहात आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात

काँग्रेस देशात आरक्षणाची लूट करू पहात आहे. काँग्रेसकडून कर्नाटकात मुसलमानांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात आले आहे. इंडि आघाडीतील एकाही नेत्याने याला विरोध केलेला नाही, असा घणाघात पंतप्रधान Narendra Modi यांनी केला आहे.

138
Narendra Modi : काँग्रेस देशात आरक्षणाची लूट करू पहात आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात
Narendra Modi : काँग्रेस देशात आरक्षणाची लूट करू पहात आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात

आपल्या सरकारच्या वेळी देशातील संसाधनांवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे, असे काँग्रेस सरकार म्हणत असे. त्याचा मी विरोध केला होता. काँग्रेसने (Congress) विकासाच्या बजेटमध्येही विभाजन केले. हिंदू बजेट आणि मुसलमान बजेट असे करण्याचा विचार होता. १५ टक्के बजेट मुसलमानांसाठी ठेवले जावे. काँग्रेसने धर्माच्या नावावर देश बनवायचा होता. देशाचे बजेट हिंदू-मुसलमान असे होऊ शकते का ? काँग्रेस देशात आरक्षणाची लूट करू पहात आहे. काँग्रेसकडून कर्नाटकात मुसलमानांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात आले आहे. इंडि आघाडीतील एकाही नेत्याने याला विरोध केलेला नाही, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केला आहे.

(हेही वाचा – Narendra Modi : नकली सेनेने राहुल गांधींना सावरकरांविषयी चार शब्द बोलायला लावावे; पंतप्रधान मोदींचे आव्हान)

महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये (Kalyan Bhiwandi) सभा आयोजित करण्यात आली होती, या वेळी ते बोलत होते.

काँग्रेस पाकिस्तानसोबत शांतीची कबूतरे उडवत होती

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या काळात सतत सूचना ऐकायला मिळत असे की, बेवारस वस्तूंपासून लांब रहा. त्या काळात कुठेही बाँम्ब फुटत होते. २०१४ नंतर कुठेतरी बेवारस वस्तूंपासून सावध रहा, असे ऐकायला मिळते का ? काँग्रेस पाकिस्तानसोबत शांतीची कबूतरे उडवत होती. मेणबत्त्या जाळत होती. प्लीज, प्लीज आमच्यावर आतंकवादी आक्रमण करू नका, अशी विनंती करत असे. पाकिस्तानने आता बाँम्बची धमकी देणे बंद केले आहे. आता पाकच्या धमक्या बंद झाल्या असल्या, तरी ती फाईल काँग्रेसवाले घेऊन फिरत आहेत. आतंकी आक्रमणे करणाऱ्यांना इंडि आघाडीवाले क्लीन चीट देत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तुष्टीकरणाच्या विरोधात मतदान करा.

ब्लू प्रिंट तयार

भारतामध्ये पहिल्यांदाच नवा आत्मविश्वास दिसून येत असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणातून भारत पहिल्यांदाच बुलंद आत्मविश्वासासोबत मोठे लक्ष साध्य करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांमध्ये कोणते काम करायचे, कोणते निर्णय घ्यायचे, यावर काम झाले आहे. सरकार तयार झाल्यानंतर केवळ विजयाच्या माळा गळ्यात घालून फिरण्याचे काम केलेले नाही. आज मी जेवढी मेहनत करत आहे, तेवढीच मेहनत चार जून नंतर देखील करणार आहे. पुढील शंभर दिवसांत सरकार काय करणार, याची ब्लू प्रिंट तयार करून आम्ही पुढे जात आहोत, असे पंतप्रधान मोदी (Narendra Modi) म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.