देश चालवण्यासाठी सर्वांची संमती आवश्यक, लोकसभा अधिवेशनाच्या भाषणाची सुरुवात करताना Narendra Modi म्हणाले…

गेल्या आठवड्यात झालेल्या NEETपरीक्षेतील गैरप्रकार, तीन फौजदारी कायदे आणि लोकसभा निवडणुकीनंतर शेअर बाजारातील अनियमितता या आरोपांवरून विरोधक यावेळी गदारोळ माजवू शकतात.

139
देश चालवण्यासाठी सर्वांची संमती आवश्यक, लोकसभा अधिवेशनाच्या भाषणाची सुरुवात करताना Narendra Modi म्हणाले...
देश चालवण्यासाठी सर्वांची संमती आवश्यक, लोकसभा अधिवेशनाच्या भाषणाची सुरुवात करताना Narendra Modi म्हणाले...

१८व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन (Lok Sabha session) सुरू झाले आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेत पोहोचलेले पीएम मोदी (Narendra Modi) म्हणाले, देश चालवण्यासाठी सर्वांची संमती आवश्यक आहे. सर्वांना सोबत घेऊन चालायचे आहे. संविधानाच्या मर्यादा पाळून देशाला पुढे न्यायचे आहे. देशाला जबाबदार विरोधी पक्षाची गरज आहे. (Lok Sabha session)

तत्पूर्वी, भाजपा खासदार भर्तृहरी महताब यांना सोमवारी सकाळी १० वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रोटेम स्पीकरची शपथ दिली. यावेळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू राष्ट्रपती भवनात उपस्थित होते.

दुसरीकडे काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी प्रोटेम स्पीकरला विरोध केला आहे. विरोधकांचे म्हणणे आहे की, सरकारने नियमांकडे दुर्लक्ष केले आणि भर्तृहरी महताब यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली. ते ७ वेळा खासदार आहेत, तर काँग्रेसचे के. सुरेश 8 वेळा खासदार आहेत. नियमानुसार काँग्रेस खासदाराला गामी स्पीकर बनवायला हवे होते.

(हेही वाचा – Rickshaw Drivers-Owners Association: रिक्षाचालकांचे राज्यभर आंदोलन, नेमकं कारण काय ? जाणून घ्या…)

राज्यसभेचे २६४वे अधिवेशन २७ जूनपासून सुरू होणार आहे. त्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा-राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधन करतील. यानंतर पंतप्रधान मोदी बोलणार आहेत. हे पहिलेच अधिवेशन आहे. त्यामुळे मोदी सरकारही विश्वासदर्शक ठराव मागणार आहे.

अधिवेशनाच्या शेवटचे २ दिवस सरकार राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव आणेल आणि त्यावर दोन्ही सभागृहात चर्चा होईल. १० वर्षांनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना तीव्र विरोधाचा सामना करावा लागणार आहे. विरोधी पक्ष इंडिया ब्लॉकचे सर्व खासदार महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ जमतील आणि तेथून एकत्र सभागृहात जातील.

गेल्या आठवड्यात झालेल्या NEETपरीक्षेतील गैरप्रकार, तीन फौजदारी कायदे आणि लोकसभा निवडणुकीनंतर शेअर बाजारातील अनियमितता या आरोपांवरून विरोधक यावेळी गदारोळ माजवू शकतात.

देशाला जबाबदार विरोधी पक्षाची गरज
यावेळी संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाला चांगल्या आणि जबाबदार विरोधी पक्षाची गरज आहे. विजयी झालेले खासदार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील. २५ कोटी नागरिकांना दारिद्र्यातून बाहेर काढल्याने भारताला दारिद्र्यमुक्त करण्यात लवकरच यश मिळेल, असा विश्वास दिला जातो. देश चालवण्यासाठी सर्वांची संमती आवश्यक आहे. सर्वांना सोबत घेऊन चालायचे आहे. संविधानाच्या मर्यादा पाळून देशाला पुढे न्यायचे आहे. सभागृहात तरुण खासदारांची संख्या चांगली आहे, ही आनंदाची बाब आहे. 18 क्रमांकाचे येथे खूप सात्विक मूल्य आहे. गीतेचे १८ अध्याय आहेत. पुराण आणि उपपुराणांची संख्या देखील १८ आहे. १८ची मूलांक संख्या ९ आहे, जी पूर्णांक आहे.

१८वी लोकसभेची सुरुवात श्रेष्ठ भारताच्या उद्देशाने
१८व्या लोकसभेला आजपासून सुरुवात होत आहे. २०४७ साली विकसित भारत हे उद्दिष्ट समोर ठेवून श्रेष्ठ भारताच्या निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी निवडणूक होणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे आजचा दिवस संसदीय लोकशाहीतील गौरवशाली दिवस आहे. हा गौरवाचा दिवस आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आपल्या नव्या संसदेत हा शपथविधी सोहळा होत आहे. आतापर्यंत जुन्या सभागृहात ही प्रक्रिया होत होती, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी या महत्त्वाच्या दिवशी मी सर्व नवनिर्वाचित खासदारांचे स्वागत केले आणि त्यांना शुभेचछा दिल्या.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.