Narendra Modi: कॉंग्रेस संधी मिळताच तुमची संपत्ती हिरावून घेईल, मोदींनी माळशिरसमधील सभेत डागले टीकास्र

164
Lok Sabha Election 2024: पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार, पंतप्रधान मोदी यांची ग्वाही
Lok Sabha Election 2024: पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार, पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

काँग्रेसवाले संधी मिळाल्यास तुमची संपत्ती हिरावून घेतील. मोठे नेते कृषीमंत्री असताना उसाचा एफआरपी २०० रुपये होता, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता लगावला आहे. ६० वर्षांत यांना जे जमले नाही ते आम्ही १० वर्षांत करून दाखवले, असे म्हणताना अनेक वर्षे रखडलेले प्रकल्प आम पूर्ण केले, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. (Narendra Modi)

यावेळी संपत्ती हिसकवणारे सरकार तुम्हाला सत्तेवर हवे का?, असा सवाल माळशिरसमध्ये बोलताना नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे. माढा लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी, (३० एप्रिल) माळशिरस येथे सभा आयोजित करण्यात आली. महायुतीचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर हे येथून निवडणूक लढवत आहेत. हायव्होल्टेज लढतीसाठी प्रचार करण्यासाठी पंतप्रधान मोदी मैदानात उतरले आहेत. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर टीका केली.

(हेही वाचा – Chhattisgarh: सुरक्षा दल आणि नक्षल्यांमध्ये मोठी चकमक, ४ नक्षलवादी ठार)

60 वर्षांत काँग्रेस जे करू शकले नाही, ते आम्ही करून दाखवले. २५ कोटी लोकांना गरिबीतून मुक्त केले, असे मोदींनी यावेळी सांगितले. पुढे ते म्हणाले की, १५ वर्षांपूर्वी एक मोठा नेता निवडणूक लढवण्यास आले होते. इथे दुष्काळाने प्रभावित क्षेत्रात पाणी पोहोचवू, अशी शपथ त्यांनी तेव्हा मावळत्या सूर्याच्या साक्षीने घेतली होती. त्यांनी पाणी दिले का? आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. आज त्या नेत्याची इथून निवडणूक लढण्याची हिंमत नाही, अशा शब्दांत त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

जनतेची मागितली माफी…
विकसित भारतासाठी मी मत मागायला आलो आहे. मी वेळेत येतो, दूरवरून येणाऱ्या लोकांची गैरसोय होते, त्यामुळे मला क्षमा करा. काही राजकीय नेत्यांनी सभेला उशीरा येण्याची फॅशन केली होती. काही लोक अजूनही येत आहेत, त्यांची मी माफी मागतो, पण मला पुढील सभेसाठी जायचे असल्याने मी वेळेत आलो आहे, मला माफ करा, अशा शब्दांत मोदींनी उशिरा येणाऱ्या लोकांची माफी मागितली.

नीळवंडे धरणाचे काम पूर्ण केले…आतापर्यंत ३६ योजना पूर्ण झाल्या
मराठवाडा, विदर्भाला पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. त्यांना यांनी त्रासवले आहे. कॉंग्रेसला जनतेने ६० वर्षे राज्य करण्याची संधी दिली, मात्र कॉंग्रेस शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवू शकली नाही. जवळपास १०० योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. त्यातील २६ योजना महाराष्ट्रातील होत्या. एवढा मोठा धोका त्यांनी महाराष्ट्राला दिला आहे. सर्वांना पाणी देण्याची माझी योजना आहे. सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी मी ताकद लावली. आतापर्यंत ३६ योजना पूर्ण झाल्या आहेत. नीळवंडे धरण आम्ही पूर्ण केले आहे. गोसे खुर्दसाठी काम चालू आहे, असेही मोदी सांगितले.

विरोधकांचा डाव
आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करून भाजपाच्या अनेक नेत्यांच्या आवाजात फेक व्हिडियो तयार करण्याचे काम सुरू आहे. देशात शांततेत निवडणुका होऊ नयेत, यासाठी येत्या महिन्याभरात देशात काहीतरी अघटित घटना घडवण्याचा विरोधकांचा डाव आहे, असा आरोप मोदींनी माळशिरस येथील सभेत केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.