काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantrya Veer Savarkar) यांना दिवसरात्र शिवी घालत असताना देखील नकली शिवसेनेने काँग्रेससमोर गुडघे टेकले आहेत. महाराष्ट्रात बाळासाहेबांचे विचार सांगणारेही काँग्रेसचा कुर्ता पकडून उभे आहेत. त्यानंतर आता नकली शिवसेनेने (Shiv Sena) वीर सावरकर हा शब्दही बोलणे बंद केले आहे. काँग्रेसच्या (Congress) शाहजाद्याने महाराष्ट्राच्या धरतीवर येऊनही वीर सावरकरांवर एक वाक्यही बोलले नाही. माझे नकली शिवसेनेला आणि शरद पवार गटाला आव्हान आहे की, हिंमत असेल, तर त्यांनी काँग्रेसच्या शहाजाद्याकडून वीर सावरकरांच्या महानतेविषयी ५ वाक्ये बोलवून घ्या, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याण येथील सभेतून केला. त्यांनी या सभेतून काँग्रेसच्या हिंदू-मुसलमान राजकारणाचा बुरखा फाडण्यासह उबाठा गटावरही आरोप केले.
(हेही वाचा – LS Forth Phase Voting : चौथ्या टप्प्याचे कमी मतदान महायुतीच्या पथ्यावर)
राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांचा अपमान
महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती, या वेळी ते बोलत होते. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. भव्य व्यासपिठावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा नाकारली. तो व्हिडिओ सर्वांनी पाहिला का, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
ब्लू प्रिंट तयार
भारतामध्ये पहिल्यांदाच नवा आत्मविश्वास दिसून येत असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणातून भारत पहिल्यांदाच बुलंद आत्मविश्वासासोबत मोठे लक्ष साध्य करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांमध्ये कोणते काम करायचे, कोणते निर्णय घ्यायचे, यावर काम झाले आहे. सरकार तयार झाल्यानंतर केवळ विजयाच्या माळा गळ्यात घालून फिरण्याचे काम केलेले नाही. आज मी जेवढी मेहनत करत आहे, तेवढीच मेहनत चार जून नंतर देखील करणार आहे. पुढील शंभर दिवसांत सरकार काय करणार, याची ब्लू प्रिंट तयार करून आम्ही पुढे जात आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community