पंतप्रधाननरेंद्र मोदींनी शुक्रवारी (८डिसेंबर) उत्तराखंड ग्लोबल इनवेस्टर्स समिटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मोदींनी तरूणांना आवाहन केल की, देवाच्या दारात लग्न करण्याऐवजी तुम्ही विदेशात जाऊन लग्नसोहळे का करता. आता देशातील तरुणांनी ‘वेड इन इंडिया मुव्हमेंट’ चालवली पाहिजे. आपल्या येथे विकास होण्यासाठी उत्तराखंडमध्ये डेस्टीनेशन वेडिंग उत्तराखंडमध्ये करायला हव असे मोदींनी म्हणले आहे. (PM Narendra Modi)
यावेळी पुढे बोलताना मोदींनी सांगितले की, मी देशातील पैसेवाले शेठ आणि गर्भ श्रीमंत लोकांना सांगू इच्छितो की, जर देव जोड्या बनवतो, मग देवाच्या दारात लग्न करण्याऐवजी तुम्ही विदेशात लग्न सोहळे का करता असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. भारतीय संस्कृती आणि सौंदर्य पाहण्यासाठी आज देशातील आणि विदेशातील नागरिकही मोठ्या प्रमाणात भारतात पर्यटन करत आहेत. (PM Narendra Modi)
(हेही वाचा :Khichdi Scam : सह्याद्री रिफ्रेशमेंटच्या खात्यातून ८ लाख भाडे आल्याचा संदीप राऊतांचा दावा)
लोकांमध्ये भारत दर्शनाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. म्हणूनच आम्ही थीम बेस्ड पर्यटनाची योजना आखत आहोत. भारताच निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक स्थळांची जगाला माहिती व्हायला पाहिजे. त्यामध्ये उत्तराखंड टुरिझम सर्वात प्रभावी ब्रॅंड बनले असेही मोदींनी म्हटले आहे. तसेच यावेळी बोलताना मोदींनी येथील लोकांना संबोधित करताना विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या विजायचाही उल्लेख केला. जनतेने स्थिर आणि मजबूत सरकार निवडून दिले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community